गुलाबाच्या फुलाला गुंडाळी मारून बसला निळ्या रंगाचा दुर्मीळ साप, व्हिडीओ पाहून लोक हैराण!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 02:15 PM2020-09-19T14:15:28+5:302020-09-19T14:20:54+5:30

हा सुंदर साप पाहून लोक हैराण झाले आहेत. या व्हिडीओची खासियत म्हणजे यात नुसता साप नाहीये तर तो गुलाबाच्या फुलाला गुंडाळी मारून बसलाय त्याने तो अधिक सुंदर दिसतो.

Blue pit viper snake with red rose rare video clip goes viral | गुलाबाच्या फुलाला गुंडाळी मारून बसला निळ्या रंगाचा दुर्मीळ साप, व्हिडीओ पाहून लोक हैराण!

गुलाबाच्या फुलाला गुंडाळी मारून बसला निळ्या रंगाचा दुर्मीळ साप, व्हिडीओ पाहून लोक हैराण!

googlenewsNext

प्रत्यक्षात किंवा सिनेमात तुम्ही अनेक वेगवेगळ्या प्रकारचे साप पाहिले असतील. पण कधी निळ्या रंगाचा साप पाहिलाय का? नाही ना...सध्या सोशल मीडियात एका दुर्मीळ निळ्या रंगाच्या सापाचा व्हिडीओ व्हायरल झालाय. हा सुंदर साप पाहून लोक हैराण झाले आहेत. या व्हिडीओची खासियत म्हणजे यात नुसता साप नाहीये तर तो गुलाबाच्या फुलाला गुंडाळी मारून बसलाय त्याने तो अधिक सुंदर दिसतो.

@planetpng नावाच्या ट्विटर यूजरने हा व्हिडीओ शेअर केला असून कॅप्शनला लिहिले की, 'फार अद्भूत ब्लू पिट वायपर'. आतापर्यंत या व्हिडीओला ९१ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले असून ७.६ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

या व्हिडीओत बघितलं जाऊ शकतं की, एका गुलाबाच्या फुलाला पकडून निळ्या रंगाचा हा दुर्मीळ आणि सुंदर साप बसलाय. ज्या हा व्हिडीओ शूट केला त्याने फुलाला जरा फिरवलं सुद्धा आहे. पण साप आपल्या जागेवरून जराही हलला नाही. हा नजारा पाहून असं वाटतं जणू सापाचं गुलाबावर प्रेम जडलंय.

अनेकांनी सांगितले की, 'ब्लू पिट वायपर' हा एक विषारी आणि खतरनाक साप आहे. हा साप हल्ला करण्यात जराही उशीर करत नाही. त्यामुळे त्यांनी सल्ला दिलाय की, या सापापासून दूर रहा आणि चुकूनही त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू नका.

Video : कष्टकरी बळीराजाला सलाम! जगाच्या पोशिंद्याला 'असं' राबताना पाहून नेटिझन्स भावूक

भारीच! नोकरी सोडली अन् आईला तीर्थयात्रेला घेऊन गेला; बाईकनं केला तब्बल ५६ हजार किमी प्रवास

जगाचा पोशिंदा कधी जिद्द नाही हरला; एक पाय नसतानाही शेतात राबला, पाहा व्हिडीओ

Web Title: Blue pit viper snake with red rose rare video clip goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.