Bear Grylls arrives Karnataka bandipur forest for shooting man vs wild with superstar Rajinikanth twitter reaction | Men Vs Wild मध्ये दिसणार थलाइवा रजनीकांत, ट्विटरवर लोक काय म्हणाले वाचल्याशिवाय येणार नाही शांत झोप!

Men Vs Wild मध्ये दिसणार थलाइवा रजनीकांत, ट्विटरवर लोक काय म्हणाले वाचल्याशिवाय येणार नाही शांत झोप!

'थलाइवा' म्हटलं की, सगळ्यांच्या डोळ्यांसमोर सर्वातआधी येतो तो सुपरस्टार रजनीकांत.रजनीकांतच्या स्टाईलवरून अजूनही कितीतरी मीम्स तयार केले जातात. आता रजनीकांत डिस्कव्हरी चॅनलच्या 'मॅन वर्सेज वाइल्ड' या लोकप्रिय शोमध्ये दिसणार आहे. यातील बेअर ग्रिल्सने सुपरस्टार रजनीकांतसोबत कर्नाटकातील बांदीपूर जंगलात एपिसोड शूट केलाय. 

रजनीकांत या एपिसोडची बातमी वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होणार नसती तरच नवल. आता या एपिसोडची लोकांमध्ये कमालीची उत्सुकता वाढली आहे. इतकेच नाही तर लोक अनेक मजेदार कमेंटही करत आहेत. तसेच अनेक मीम्सही शेअर करत आहेत.

Mes Vs Wild चा रजनीकांतचा हा एपिसोड कधी प्रसारित केला जाणार याबाबत सध्या काहीही माहिती मिळू शकली नाही. आता खुद्द रजनीकांत या धाडसी कार्यक्रमात दिसणार असल्याने त्याला प्रतिसाद कसा मिळेल हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे.


Web Title: Bear Grylls arrives Karnataka bandipur forest for shooting man vs wild with superstar Rajinikanth twitter reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.