घरी आलेल्या जंगली अस्वलाला महिलेने दरवाजा लावायला सांगितला, अन् पुढे असं घडलं की...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 05:13 PM2021-11-28T17:13:02+5:302021-11-28T17:15:03+5:30

तुम्ही कधी विचार केला आहे का? की, तुमच्या घरात अस्वल घुसले तर तुमचे काय होईल? आता असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये अमेरिकेतील न्यू जर्सीच्या निर्जन भागात राहणाऱ्या एक महिलेच्या घरी अस्वल आलं.

bear closing front door on the request of woman | घरी आलेल्या जंगली अस्वलाला महिलेने दरवाजा लावायला सांगितला, अन् पुढे असं घडलं की...

घरी आलेल्या जंगली अस्वलाला महिलेने दरवाजा लावायला सांगितला, अन् पुढे असं घडलं की...

googlenewsNext

अस्वलाचे अनेक किस्से बघायला आणि ऐकायला मिळतात. सोशल मीडियावर अस्वलाचे व्हिडिओ अनेकदा पाहायला मिळतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? की, तुमच्या घरात अस्वल घुसले तर तुमचे काय होईल? आता असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये अमेरिकेतील न्यू जर्सीच्या निर्जन भागात राहणाऱ्या एक महिलेच्या घरी अस्वल आलं.

हा व्हिडिओ यूट्यूबसह इतरही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. तुम्ही Susan Kehoe नावाच्या पेजवर सर्व व्हिडिओ पाहू शकता. न्यू जर्सीच्या व्हर्नन इथं राहणाऱ्या सुसान केहो नावाच्या महिलेने सांगितले की, तिला तिच्या घराबाहेर काही विचित्र आवाज ऐकू आले. यानंतर दार उघडून तिला पाऊस पडतोय का ते पाहायचे होते. जेव्हा त्याने दार उघडले, तेव्हा एक भयानक अस्वल तिच्या समोर उभे होते. जे पाहून ती खूप घाबरली होती, पण त्यानंतर जे घडले ते आश्चर्यचकित करणारे होते. महिलेने जे केले ते पाहून तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. खरं तर, बाई अस्वलाला म्हणाली, ‘मिस्टर बेअर, कृपया माझा दरवाजा बंद कराल का?’

व्हिडिओमध्ये ती महिला अस्वलाला प्रेमाने म्हणताना दिसत आहे आणि अस्वलानेही तिची आज्ञा पाळली आणि तोंडाने दरवाजा बंद केला. सुरुवातीला त्याला दरवाजा बंद करता येत नव्हता. तेव्हा ती महिला म्हणाली- मित्रा दार बंद कर.’ त्यानंतर अस्वलाने दाराचे हँडल तोंडाने धरले आणि दरवाजा पूर्णपणे बंद केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, लोक त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.

Web Title: bear closing front door on the request of woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.