कौतुकास्पद! स्वत: पूराच्या पाण्यात उतरत आमदाराने वाचवले लोकांचे जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 12:06 PM2020-07-14T12:06:17+5:302020-07-14T12:11:30+5:30

या महापूरामुळे २४ जिल्ह्यांच्या  २ हजार पंधरा गावातील जवळपास १३ लाख लोकांना महापूराचा फटका बसला आहे. 

Assam flood mla mrinal saikia rescue people from flood video goes viral | कौतुकास्पद! स्वत: पूराच्या पाण्यात उतरत आमदाराने वाचवले लोकांचे जीव

कौतुकास्पद! स्वत: पूराच्या पाण्यात उतरत आमदाराने वाचवले लोकांचे जीव

Next

महापूरामुळे आसाममध्ये लोकांना प्रचंड संकटांचा  सामना करावा लागत आहे. दरम्यान सोशल मीडियावर एका आमदाराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आतापर्यंत तुम्ही गोरगरीबांना मदत करणारा नेता पाहिला असेल. पण इथेमात्र स्वतः पाण्यात उतरून आमदार लोकांची मदत करत आहे. तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता. आमदार मृणाल सैकिया सुदूर गावात गेले आणि त्यांनी स्वतः पाण्यात जाऊन रेक्यू ऑपरेशन केले आहे. या कामासाठी मृणाल यांना गावतील लोकांनी मदत केली आहे. 

याच आमदाराने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आलं की, माझ्या संपूर्ण विधानसभा क्षेत्रात पावसाने हाहाकार पसरवला आहे. पावसात अडकलेल्या लोकांची मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. तुम्हाला माहीत असेल ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेत प्राण्यांचे खूप मोठे योगदान असते. त्यामुळे पुराच्या पाण्यात अकडलेले लोक आपल्या प्राण्यांना सोडून जाऊ शकत नाहीत. यासाठी लोकांमध्ये जाऊन आमचे बचावकार्य सुरू आहे. या महापूरामुळे २४ जिल्ह्यांच्या  २ हजार पंधरा गावातील जवळपास १३ लाख लोकांना महापूराचा फटका बसला आहे. 

सोशल मीडियावर हा व्हिडीयो खूप व्हायरल होत आहे. या निमित्ताने जनतेने नेमलेले लोक प्रतिनिधी तत्परतेने मदतीचा हात देत असल्याचे दिसून आले आहे. कोरोनामुळे आधीच लोकांचे हाल होत आहे. त्यात आता महापूरानेही झोपडलं त्यामुळे लोकप्रतिनिधी देवदूताप्रमाणे लोकांच्या मदतीसाठी धावून आलेले दिसून येत आहेत. 

काही दिवासांपूर्वी असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. भारतीय सेनेच्या जवानांनी एका जबरदस्त काम केले होते. ही घटना अरूणाचल प्रदेशात घडलेली. इथे एका गर्भवती हरीणाचा जीव वाचवण्यासाठी सेनेच्या एका जवानानं वाहत्या नदीत उडी घेतली  होती. Easterncomd या ट्विटर यूजरने याबाबतची माहिती शेअर केली आहे. त्यांनी लिहिले की, 'भारतीय सेनेच्या यूनिटने 2 जूनला एका मादा हरीणाला जायडिंग खो नदीत बुडण्यापासून वाचवले. त्यानंतर वनविभागाच्या मदतीने त्यावर उपचार करण्यात आले. नंतर हरणाला जंगलात सोडण्यात आले'.

क्यों हिला डाला ना? रशियाने लस तयार केल्यानंतर सोशल मीडियावर भन्नाट मीम्सचा धुमाकूळ

वाह, कमाल! फोटोग्राफरनं उभा केला कॅमेराचा बंगला; एका मुलाचं नाव ठेवलं Cannon तर दुसऱ्याचं...

Web Title: Assam flood mla mrinal saikia rescue people from flood video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.