VIDEO: कचरा गोळा करणाऱ्या दोन भावंडांचं टॅलेंट पाहून भारावले महिंद्रा; केली महत्त्वाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 04:01 PM2021-02-22T16:01:54+5:302021-02-22T16:05:57+5:30

Anand Mahindra: आनंद महिंद्रानी दोन भावंडांचे व्हिडीओ केले शेअर; कचरा गोळा करणाऱ्या मुलांचा आवाज महिंद्रा भारावले

anand mahindra wants to help 2 singer brother of delhi shares video | VIDEO: कचरा गोळा करणाऱ्या दोन भावंडांचं टॅलेंट पाहून भारावले महिंद्रा; केली महत्त्वाची घोषणा

VIDEO: कचरा गोळा करणाऱ्या दोन भावंडांचं टॅलेंट पाहून भारावले महिंद्रा; केली महत्त्वाची घोषणा

Next

मुंबई: उद्योगपती आणि महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा (Anand Mahindra) सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. महिंद्रा त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून मजेशीर फोटो आणि व्हिडीओ शेअर करतात. प्रेरणादायी विचार, गोष्टी शेअर करणारे महिंद्रा यांनी ट्विटरच्या माध्यमातून अनेक गरजूंना मदत केली आहे. आता महिंद्रा यांनी दिल्लीतल्या दोन भावांचे व्हिडीओ शेअर केले आहेत. या दोघांना मदत करण्यासाठी लोकांनी संगीत शिक्षकाची माहिती द्यावी, असं आवाहन महिंद्रा यांनी केलं आहे.

आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमधील दोन भाऊ दिल्लीत कचरा वेचण्याचं काम करतात. मात्र या दोघांमध्ये एक कला दडली आहे. कचरा वेचणारे दोन्ही भाऊ उत्तम गातात. हाफिज आणि हबीबुर अशी दोघांची नावं आहेत. आनंद महिंद्रा यांना त्यांचा मित्र रोहित कट्टरनं हाफिज आणि हबीबुर यांचे व्हिडीओ पाठवले. ते महिंद्रा यांनी ट्विटरलर शेअर केले. 



'अतुल्य भारत! माझा मित्र रोहित कट्टर याने हे व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यांना सोशल मीडियावर हे व्हिडीओ मिळाले. हाफिज आणि हबीबुर हे दोन्ही भाऊ अतिशय मेहनती आहेत. ते दिल्लीच्या न्यू फ्रेंड्स कॉलनीत कचरा गोळा करण्याचं काम करतात. प्रतिभा कुठे आणि कोणामध्ये सापडेल, याची तुम्ही कल्पनादेखील करू शकत नाही,' असं महिंद्रा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.



दुसऱ्या एका ट्विटमध्ये महिंद्रा यांनी दोन्ही भावांचं तोंड भरून कौतुक केलं आहे. 'या दोघांमध्ये कमालीची प्रतिभा आहे. या दोघांना संगीताचं शिक्षण मिळावं यासाठी मदत करण्याचा निश्चय मी आणि रोहितनं केला आहे. दोन्ही भाऊ दिवसभर कामात असतात. त्यामुळे त्यांना संध्याकाळी संगीत शिकवू शकेल, असा शिक्षक मिळू शकेल का? दिल्लीत राहणारी कोणी व्यक्ती याबद्दलची माहिती देऊ शकेल का?' असं महिंद्रा यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Web Title: anand mahindra wants to help 2 singer brother of delhi shares video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.