बापरे! जीवाची बाजी लावून केलेला जुगाड पाहून आनंद महिंद्रा झाले हैराण; पाहा व्हायरल व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 03:28 PM2020-06-24T15:28:17+5:302020-06-24T15:29:28+5:30

जुगाड करण्यासाठी लोकांनी आपला जीव धोक्यात घातला आहे. 

Anand mahindra tweets shocking jugaad video goes viral | बापरे! जीवाची बाजी लावून केलेला जुगाड पाहून आनंद महिंद्रा झाले हैराण; पाहा व्हायरल व्हिडीओ

बापरे! जीवाची बाजी लावून केलेला जुगाड पाहून आनंद महिंद्रा झाले हैराण; पाहा व्हायरल व्हिडीओ

Next

आत्तापर्यंत तुम्ही अनेक जुगाड पाहिले असतील पण असा  जुगाड पाहिला नसेल, सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून लोक हैराण होत आहेत. कारण जुगाड करण्यासाठी लोकांनी आपला जीव धोक्यात घातला आहे. 

या व्हिडीओमध्ये एका ट्रकमधील अवजड सामान खाली उतरवण्यासाठी लोकांना चक्क ट्रक हातांनी उलटा केला आहे. सगळ्यात लहान असलेला ट्रिपर ट्रक माहागात पडू शकतो. अनेकांनी या व्हिडीओतील माणसांचे कौतुक केले आहे.  कारण कोणत्याही साहित्याशिवाय माणूस जगू शकतो असं लोकांचे म्हणणे आहे. 

आनंद महिंद्रा यांनी या व्हिडीओला कॅप्शन दिले आहे की, आज हा व्हिडीयो सहज मिळाला. यांनी सगळ्यात स्वस्त ट्रिपर ट्रक तयार केला. हा वेडेपणा आहे. ते ही सुरक्षेच्या आणि क्षमतेच्या  नियंमाचे उल्लंघन करून तयार केला आहे. पण त्या लोकांना हा ट्रक हातात पकडला आहे जे त्यांच्यासाठी नुकसानकराक ठरू शकतं.  कोणतंही साहित्य नसताना लोक कसं मॅनेज करतात हे पाहून मी हैराण आहे. 

या व्हिडीओला आत्तापर्यंत  ६७ हजारांपेक्षा जास्त व्हिव्हज आणि ५ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.  भारतीयांच्या जुगाड करण्याच्या पद्धतीचे उत्तम उदाहरण तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता. कारण जीवाची पर्वा न करता हे लोक स्वतःचं काम करत आहेत. सोशल मीडियावर या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 

पैसा ही पैसा होगा! आयुर्वेदिक औषध लॉन्च केल्या केल्या नेटकऱ्यांनी पाडला मीम्सचा पाऊस

मशरूमच्या आकाराचा ढग दिसला, लोकांना वाटलं अणुबॉम्ब फुटला

Web Title: Anand mahindra tweets shocking jugaad video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.