Valentines day: व्हेलेंटाईन डे चं भन्नाट गिफ्ट; आनंद महिंद्रांनी शेअर केली कोरोना लसीची जाहिरात, पाहा व्हिडीओ.....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2021 10:26 AM2021-02-14T10:26:57+5:302021-02-14T10:32:51+5:30

Valentines day gift of covid-19 vaccine Video shared by anand mahindra : . महिंद्रांकडून शेअर करण्यात आलेली ही जाहिरात पाहून तुम्हीसुद्धा त्यांचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. 

Anand mahindra shared covid-19 vaccine add people said best valentines day gift watch video | Valentines day: व्हेलेंटाईन डे चं भन्नाट गिफ्ट; आनंद महिंद्रांनी शेअर केली कोरोना लसीची जाहिरात, पाहा व्हिडीओ.....

Valentines day: व्हेलेंटाईन डे चं भन्नाट गिफ्ट; आनंद महिंद्रांनी शेअर केली कोरोना लसीची जाहिरात, पाहा व्हिडीओ.....

Next

अनेक महिने वाट पाहिल्यानंतर आता कोरोनाची लस (Covid-19 vaccine)  सर्वसामान्यांसाठी उपलब्ध झाली आहे.  कोरोनाची लस  घेण्याबाबत लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे तर दुसरीकडे लसीचे सौम्य साईड इफेक्ट्स दिसून आल्यामुळे काही लोकांच्या मनात भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. 
प्रसिद्ध बिझनेसमन आनंद महिंद्रा (businessman Anand Mahindra)  यांनी लसीबाबत जनजागती पसरवण्यासाठी एक आकर्षक आणि रचनात्मक जाहिरात (hilarious parody advertisement)  शेअर केली आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओनं अनेकांना आकर्षित केलं आहे. महिंद्रांकडून शेअर करण्यात आलेली ही जाहिरात पाहून तुम्हीसुद्धा त्यांचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. 

ट्विटरवर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर शेअर केलेली जाहिरात जीमी किमेल शो (Jimmy Kimmel show) वर प्रसारित करण्यात आली आहे. त्यानंतर या व्हिडीओवर लोकांनी कौतुकाचा वर्षाव केलेला पाहायला मिळत आहे. महिंद्रांनी आपल्या ट्विटमध्ये सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पुनावाला  (Serum Institute CEO Adar Poonawalla) यांनाही टॅग केले आहे.  या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आहे की,प्रफुल्लीत करणारी @adarpoonawalla  तुमच्यासाठी एक खास जाहिरात आहे. ही लस नेहमीसाठी आहे. 'मला नवऱ्याकडे जायचंय'; असं म्हणत नवऱ्यासाठी ढसाढसा रडू लागली चिमुरडी; पाहा व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर काही तांसापूर्वी शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत १ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं असून अनेकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. व्हॅलेंटाईन डे या थीमवर आधारित ही जाहिरात लोकांना खूप आवडली आहे. ५ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं  आहे. ३० सेंकंदाच्या या व्हिडीओमध्ये लसीबाबत सकारात्मक दृष्टीकोन मांडलेला दिसून येत आहे.   बाबो! भारतातल्या या मंदिरात एकाच दिवशी आलं एवढं दान; नोटा मोजता मोजता लोकांना फुटला घाम...

Web Title: Anand mahindra shared covid-19 vaccine add people said best valentines day gift watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.