Video: अमेरिकनांनी आयुष्यात पहिल्यांदा हाजमोला खाल्ले; रिअ‍ॅक्शन पाहून पोट धरून हसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 04:33 PM2021-07-25T16:33:44+5:302021-07-25T16:35:36+5:30

Hajmola ate by Americans: एका युट्यूब चॅनलने हा कारनामा करून दाखविला आहे. अमेरिकनांना हाजमोला खायला दिली आणि त्यांची रिअ‍ॅक्शन कॅमेरात कैद केली आहे.

Americans Try Dabar's Hajmola For The First Time, Hilarious Reactions Inside video watch | Video: अमेरिकनांनी आयुष्यात पहिल्यांदा हाजमोला खाल्ले; रिअ‍ॅक्शन पाहून पोट धरून हसाल

Video: अमेरिकनांनी आयुष्यात पहिल्यांदा हाजमोला खाल्ले; रिअ‍ॅक्शन पाहून पोट धरून हसाल

Next

भारतीयांनी आयुष्यात एकदा तरी हाजमोला (Hajmola) खाल्ले असेल. यामुळे त्यांना ही गोळी खाल्ल्यानंतर जीभेवर काय चव असते हे माहिती असेल. अनेकांनी जेवल्यानंतर तोंडाची चव बदलण्यासाठी खाल्ली असेल. आजही अनेक लोक हाजमोला खातात.  परंतू तुम्ही कधी विचार केला असेल का, की जर ही गोळी अमेरिकनांनी (American) खाल्ली तर त्यांची तोंडाची रिअ‍ॅक्शन काय असेल? चला पाहुया. (Watch The Hilarious Reactions Of Americans Eating Hajmola For The First Time)

एका युट्यूब चॅनलने हा कारनामा करून दाखविला आहे. अमेरिकनांना हाजमोला खायला दिली आणि त्यांची रिअ‍ॅक्शन कॅमेरात कैद केली आहे. ही रिअ‍ॅक्शन पाहून तुम्हाला काही काळ हसू आवरणार नाही, हे नक्की. Our Stupid Reactions ने ४ जुलै रोजी हा व्हिडीओ अपलोड केला होता. यामध्ये Rick Segall आणि Korbin Miles होस्ट आहेत. या प्रयोगावेळी रिकीची आईदेखील आली होती. तिने तर एकदम खतरनाक रिअ‍ॅक्शन दिली आहे. 

या व्हिडीओला आजवर 85 हजार व्ह्यूवज मिळाले आहेत. 

हाजमोला कशासाठी वापरतात...
हाजमोला हे आयुर्वेदिक औषध आहे. पोटात गॅस होणे, अपचन आदी पोटाच्या विकारावर हे गुणकारी आहे. हाजमोला हे डाबर कंपनी बनविते. 

Web Title: Americans Try Dabar's Hajmola For The First Time, Hilarious Reactions Inside video watch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.