Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 19:39 IST2025-12-02T19:38:53+5:302025-12-02T19:39:59+5:30
father daughter korean heart emotional video: या व्हिडिओमागील कथा साधी सोपी आहे, पण तरीही त्याचा परिणाम हृदयस्पर्शी आहे.

Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
father daughter korean heart emotional video: वडील आणि मुलगी हे नातं जगातील सर्वात सुंदर नात्यांपैकी एक मानले जाते. बापलेकीच्या नात्याला नेहमीच भावनेची किनार असते. मुलगी तिच्या वडिलांच्या खूप जवळ असते. वेळप्रसंगी वडील आपल्या मुलीसाठी ढाल बनतात आणि तिच्यावरील संकटे आपल्या अंगावर घेतात. तसेच, मुलगीदेखील मोठी झाली की आपल्या वडिलांसाठी आधार बनते. दोघांमधील बंध अतिशय छान असतो. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओची जोरदार चर्चा रंगली आहे.
व्हिडीओमध्ये काय घडलं?
या व्हिडिओमागील कथा साधी सोपी आहे, पण तरीही त्याचा परिणाम हृदयस्पर्शी आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की, कोरियन नाटके, चित्रपट आणि संस्कृती जगभरात लोकप्रिय झाली आहे. कोरियन हार्ट ट्रेंड सोशल मीडियावर देखील लोकप्रिय आहे. कोरियन हार्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लहान चिन्ह तयार केले जाते. हल्ली सर्व वयोगटातील लोक या हावभावाचा वापर करताना दिसतात. व्हायरल व्हिडिओमध्ये एक मुलगी ट्रेनमध्ये चढताना दिसते आणि खिडकीजवळ उभ्या असलेल्या तिच्या वडिलांसाठी कोरियन हार्ट दाखवते. मुलीचा निरागस हावभाव वडिलांना समजत नाही. मुलगी आपल्याकडे खर्चासाठी पैसे मागतेय असा त्यांचा समज होतो. त्यामुळे ते चुकीचा अर्थ लावतात आणि तिला पैसे देऊ करतात.
A father does everything for his child pic.twitter.com/oxTelIjr22
— Bhumika (@sankii_memer) December 1, 2025
हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होतोय. या व्हिडीओमधील वडिलांची निरागसता पाहून नेटकरी विविध कमेंट्स करताना दिसत आहेत. कारण हा व्हिडीओ वरवर खूप साधा वाटत असला तरीही त्यात वडिलांचे मुलीवर प्रेम दिसते.