संपता संपेनात...पल्सरच्या टाकीत पेट्रोल नाही, नोटांच्या गड्ड्या; Video काढताना पोलिसही चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 12:52 PM2021-04-06T12:52:16+5:302021-04-06T12:53:14+5:30

money Smuggling in Bajaj Pulsar Tank secret box:निवडणुकीचा काळ असल्याने पैशांचे वाटप केले जाते. आचारसंहितेमुळे ठराविक रकमेच्या वर रक्कम सोबत बाळगता येत नाही. तसेच तर न्यायची असेल तर बँकेची स्लिप किंवा उद्योग धंद्याची स्लिप सोबत असावी लागते. परंतू या पठ्ठ्याने पैसे अशा ठिकाणी लपविले होते की त्या मागचा उद्देश हा व्हिडीओ (Video) पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल

500 notes bundles smuggling in Bajaj Pulsar Fuel tank; Police also shocked while recording Video | संपता संपेनात...पल्सरच्या टाकीत पेट्रोल नाही, नोटांच्या गड्ड्या; Video काढताना पोलिसही चक्रावले

संपता संपेनात...पल्सरच्या टाकीत पेट्रोल नाही, नोटांच्या गड्ड्या; Video काढताना पोलिसही चक्रावले

googlenewsNext

देशात काही राज्यांत निवडणुकीचा (Election) हंगाम सुरु आहे. कोरोनामुळे अनेकांना दररोजचा रोजगार मिळविणे कठीण झाले आहे. अशातच बजाज पल्सर (Bajaj Pulsar) या बाईकच्या टाकीतून पेट्रोल नाही तर ५०० च्या नोटांची बंडले नेताना (money smuggling) पोलिसांनी पकडले आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला ते समजले नसून सोशल मीडियावर तामिळनाडू, केरळ मधील असल्याचे म्हटले जात आहे. (500 rs bundles smuggling in Bajaj Pulsar Fuel tank caught.)


निवडणुकीचा काळ असल्याने पैशांचे वाटप केले जाते. आचारसंहितेमुळे ठराविक रकमेच्या वर रक्कम सोबत बाळगता येत नाही. तसेच तर न्यायची असेल तर बँकेची स्लिप किंवा उद्योग धंद्याची स्लिप सोबत असावी लागते. परंतू या पठ्ठ्याने पैसे अशा ठिकाणी लपविले होते की त्या मागचा उद्देश हा व्हिडीओ (Video) पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल. महत्वाचे म्हणजे या बाईकस्वाराला पकडणाऱ्या त्या चाणाक्ष पोलिसालाही सलाम ठोकाल. 

चार नवे रंग, Bajaj Pulsar 150 नवा अपडेटेड अवतार; यामाहा FZS FI ला टक्कर देण्याच्या तयारीत

नेहमीप्रमाणे काळ्या रंगाच्या पल्सर बाईकच्या टाकीवर त्या स्मगलरने पॉकेटसारखे कव्हर येते ते घातले होते. त्या कव्हरमध्ये पैसे नव्हते. तर त्या कव्हरच्या आतमध्ये असलेल्या टाकीमध्ये चोरकप्पा बनविण्यात आला होता. हा चोरकप्पा कोणाच्याही लक्षात येणारा नाही. पल्सरचा पेट्रोल टँक इतर बाईकपेक्षा मोठा असतो. जास्त पेट्रोल रहावे यासाठी कंपनीने तो दिलेला आहे. मात्र, या पठ्ठ्याने त्यालाच चोरकप्पा बनविला आहे. या पठ्ठ्याने थोडेथोडके नव्हे तर जवळपास 15 लाखांच्या आसपास 500 रुपयांच्या नोटांची बंडले ठेवली होती. 


पोलिसांनी पकडल्यानंतर त्याची ती बाईक पोलीस ठाण्यात नेण्यात आली. आता या स्मगलरचा कारनामा पाहण्य़ासाठी पोलिसांचीच गर्दी झाली. एक बंडल काढले, दुसरे काढले असे करता करता त्याने 25 ते 30 बंडले त्या टाकीतून बाहेर काढली. हे पाहून व्हिडीओ बनविणारे पोलिसही चक्रावले होते.

पहा हा व्हिडीओ....



 

Web Title: 500 notes bundles smuggling in Bajaj Pulsar Fuel tank; Police also shocked while recording Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.