जगातले १० असे विचित्र प्रश्न ज्यांचं उत्तर तुमच्याकडे नसेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 02:17 PM2019-11-21T14:17:32+5:302019-11-21T14:17:55+5:30

जगात असे अनेक प्रश्न असतात ज्यांचं काहीच उत्तर नसतं. काही प्रश्न विचारल्यावर तर हसावं की रडावं हेच कळत नाही. कधी कधी तर काही प्रश्नांनी दिमागाचं दही होतं.

10 stupid questions with no answers | जगातले १० असे विचित्र प्रश्न ज्यांचं उत्तर तुमच्याकडे नसेल!

जगातले १० असे विचित्र प्रश्न ज्यांचं उत्तर तुमच्याकडे नसेल!

googlenewsNext

(Image Credit : psychologytoday.com)

जगात असे अनेक प्रश्न असतात ज्यांचं काहीच उत्तर नसतं. काही प्रश्न विचारल्यावर तर हसावं की रडावं हेच कळत नाही. कधी कधी तर काही प्रश्नांनी डोक्याचं दही होतं. अनेकदा तर समोरून आलेला प्रश्न बरोबर आहे की नाही हेच कळत नाही. खरंतर अशाप्रकारचे विचित्र प्रश्न पडायला डोकं नाही तर क्रिएटीव्हिटी लागते. असेच काही लोकांना पडणारे विचित्र प्रश्न आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. जास्त मनावर घेऊ नका.

१) जर 21 ला इंग्रजीमध्ये 'Twenty One' म्हटलं जातं, तर 11 ला 'Onety-One' का नाही? 

Image result for question gif

२) भांडी घासण्याच्या साबणात खरं लिंबू आणि लिंबाच्या ज्यूसमध्ये Artificial Flavors, असं का?

3) २ मिनिटात होते असं सांगितली जाणारी मॅगी दोन मिनिटाक कार होत नाही?

४) महिला तोंड बंद करून मस्करा का लावू शकत नाहीत?

Related image

५) Donald Duck आंघोळ करून बाहेर येताना टॉवेल गुंडाळतो, पण पॅंट का घालत नाही?

(Image Credit : pinterest.com)

६) जर पादल्यानंतर फार हलकं वाटतं, तर लोक पादण्यासाठी लाजतात का?

(Image Credit : gmanetwork.com)

७) गोल आकाराचा पिझ्झा चौकोणी आकाराच्या डब्यात का दिला जातो?

(Image Credit : artofmanliness.com)

८) जेव्हा ग्रीनलॅंड बर्फाने झाकलेलं असतं, तर याचं नाव ग्रीनलॅंड का?

(Image Credit : pulitzercenter.org)

९) कंपनीवाले 'तुम्हाला ही नोकरी का करायची आहे?' असं का विचारतात?

Related image

१०) बर्फ वितळण्याआधी पांढरा असतो, वितळल्यावर पांढरा रंग कुठे जातो?

(Image Credit : foodnetwork.com)

तुम्हालाही असे प्रश्न कधीना कधी नक्कीच पडले असतील. पण उत्तरं काही मिळाली नसतील.


Web Title: 10 stupid questions with no answers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.