गाव तिथे राष्ट्रवादी अभियानातून पक्षाला उभारी देणार, तिन्ही जागा लढविण्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 05:06 PM2019-09-23T17:06:59+5:302019-09-23T17:08:28+5:30

सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उभारी देण्यासाठी निष्ठावान कार्यकर्त्यांना मुख्य प्रवाहात आणले जाईल. विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून तीनही जागा लढविण्याची तयारी करण्यात आली आहे. सर्वसामान्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी राष्ट्रवादी आंदोलनाच्या माध्यमातून जनतेला न्याय मिळवून देईल, अशी माहिती जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिली.

The village will raise the party from the Nationalist Mission there, ready to contest all three seats | गाव तिथे राष्ट्रवादी अभियानातून पक्षाला उभारी देणार, तिन्ही जागा लढविण्याची तयारी

मालवण येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचे स्वागत करण्यात आले.

googlenewsNext
ठळक मुद्देगाव तिथे राष्ट्रवादी अभियानातून पक्षाला उभारी देणार, तिन्ही जागा लढविण्याची तयारी : अमित सामंत

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उभारी देण्यासाठी निष्ठावान कार्यकर्त्यांना मुख्य प्रवाहात आणले जाईल. विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून तीनही जागा लढविण्याची तयारी करण्यात आली आहे. सर्वसामान्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी राष्ट्रवादी आंदोलनाच्या माध्यमातून जनतेला न्याय मिळवून देईल, अशी माहिती जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिली.

जिल्हाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सामंत हे प्रथमच मालवण येथे आले होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेतल्या. आगामी काळात गाव तिथे राष्ट्रवादी हे अभियान राबविले जाणार असून त्याची सुरुवात मालवण तालुक्यापासून होणार आहे, असे सामंत यांनी सांगितले.

यावेळी तालुकाध्यक्ष विश्वास साठे, अगोस्तीन डिसोजा, विनोद आळवे, बाबू डायस, प्रमोद कांडरकर, सदानंद मालंडकर, किरण रावले, हरिश्चंद्र परब, अशोक पराडकर, बाळ कनयाळकर आदी उपस्थित होते.

शिवसेनेला जशास तसे उत्तर देऊ!

मालवण पालिकेत राष्ट्रवादी पक्षाच्या दोन नगरसेविका प्रतिनिधीत्व करीत होत्या. मात्र, पालिकेत गटातटाचे राजकारण सुरू असल्याने आमच्या नगरसेविकांनी पक्षाला पूर्वसूचना न देता स्वार्थासाठी शिवसेनेत प्रवेश केला. त्याचे मला वाईट वाटते. शिवसेना फोडाफोडीचे राजकारण करीत असेल तर आठ दिवसांत आम्हीही शिवसेनेला जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा अमित सामंत यांनी दिला.
 

Web Title: The village will raise the party from the Nationalist Mission there, ready to contest all three seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.