जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह अवकाळी पाऊस; आंबा, काजू बागायतदार संकटात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 06:17 PM2022-01-17T18:17:40+5:302022-01-17T18:32:19+5:30

कणकवली : सर्वत्र कडाक्याच्या थंडी पडली असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह - अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे आंबा, ...

Unseasonal rain with cloudy weather in Sindhudurg district | जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह अवकाळी पाऊस; आंबा, काजू बागायतदार संकटात

जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह अवकाळी पाऊस; आंबा, काजू बागायतदार संकटात

googlenewsNext

कणकवली : सर्वत्र कडाक्याच्या थंडी पडली असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह - अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे आंबा, काजू, जांभूळ, फणस, आदी झाडांच्या मोहोरावर मोठया प्रमाणात परिणाम जाणवू लागला आहे.

ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाने मोहोर जळून जात आहे. वारंवार पडणारा अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरण तसेच धुके यामुळे आंबा व काजू बागायत शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. 

जिल्ह्यातील बहुतांशी शेतकरी आंबा, काजू, बागायतींवर आपला उदरनिर्वाह करतो. मात्र बदलल्या वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या  हातातोंडाशी घास हिरावून घेतला जात आहे. यामुळे बागायतदार शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

गेली दोन वर्षे कोरोना संसर्ग असल्यामुळे आंबा काजू शेतकरी संकटात असताना अवकाळी पावसामुळे यावर्षीही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली. कृषी विभागाने कोकणातील शेतकऱ्यांना, अवकाळी पावसामुळे झालेल्या बागायतदारांना, नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी  केली जात आहे.

Web Title: Unseasonal rain with cloudy weather in Sindhudurg district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.