कोकण रेल्वेच्या मंगळुरु ते मुंबई मार्गावर वाहतूक पूर्ववत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 08:18 PM2019-08-11T20:18:54+5:302019-08-11T20:19:11+5:30

मडगाव : कोकण रेल्वे मार्गावरील मंगळुरु ते मुंबई पर्यंतची वाहतूक आज रविवारी सुरळीत सुरु होती. कोकण रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क ...

Undertaking traffic on the Konkan Railway from Mangaluru to Mumbai | कोकण रेल्वेच्या मंगळुरु ते मुंबई मार्गावर वाहतूक पूर्ववत

कोकण रेल्वेच्या मंगळुरु ते मुंबई मार्गावर वाहतूक पूर्ववत

googlenewsNext

मडगाव : कोकण रेल्वे मार्गावरील मंगळुरु ते मुंबई पर्यंतची वाहतूक आज रविवारी सुरळीत सुरु होती. कोकण रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी ही माहिती दिली. केरळ येथे रेल्वे रुळावर पाणी भरल्याने व मुसळधार पावसाने काही ठिकाणी दरडी कोसळल्याने काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या. तर काहींचा मार्ग बदलण्यात आला होता. गोव्यातून मुंबईकडे जाणाऱ्या कोकण रेल्वे मार्गावरील सर्व रेलगाड्या नियोजित वेळापत्रकानुसार धावत होत्या. 


केरळ येथे पावसामुळे काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या. रद्द करण्यात आलेल्या गाड्या पुढील प्रमाणे...
 गाडी क्र. 16345 लोकमान्य टिळक टर्मिनस- त्रिवेंद्रम एक्स्प्रेस, तर गाडी क्र. 16311 श्री गंगानगर -कोचुवेल्ली एक्स्प्रेस,  हुबळी- वास्कोदिगामा एक्स्प्रेस,गाडी क्र. 10215 मडगाव- एर्नाकुलम एक्स्प्रेस , 22150 पुणो- एर्नाकुलम एक्स्प्रेस,10216 एर्नाकुलम - मडगाव एक्स्प्रेस, 11098 एर्नाकुलम - पुणो एक्स्प्रेस, 19577  तेरुनेवल्ली- लालपूर जाम एक्स्प्रेस, 12283 एर्नाकुलम- निजामुददीन एक्स्प्रेस, 22149 एर्नाकुलम- पुणोएक्स्प्रेस, 12483 कोचुवेल्ली-अमृतसर एक्स्प्रेस या गाडय़ा रदद करण्यात आल्या.


 गाडी क्र. 12618 निजामुददीन -एर्नाकुलम , गाडी क्र. 22634 निजामुददीन -त्रिवेंद्रम या गाडय़ा दुस:या मार्गेवळविण्यात आल्या तर गाडी क्र. 16337 ओका- एर्नाकुलम ही गाडी लालपूर जाम ते एर्नाकुलमपर्यत तात्पुरती बंद करण्यात आली आहे. गाडी क्र. 12617 एर्नाकुलम- निजामुददीन, गाडी क्र. 19261 कोचुवेल्ली- पोरबंदर एक्स्प्रेस, गाडी क्र. 16346 त्रिवेंद्रम लोकमान्य टिळक एक्स्प्रेस, गाडी क्र. 12202 कोचुवेल्ली- लोकमान्य टिळक या रेल्वे  काल तात्पुरत्या थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. तर गाडी क्र. 12432 निजामुददीम- त्रिवेंद्रम एक्स्प्रेस ही दुस:या मार्गाने वळविण्यात आली. 


दरम्यान, कारवार येथे दरड कोसळल्याची माहिती जी फैलावली होती ती खोटी असल्याचे जनसंपर्क अधिकारी घाडगे यानी सांगितले. अशा प्रकारे कुणीही  खोटी माहिती पसरु नये संबंधितांवर तक्रार दाखल केली जाईल असा इशारा त्यानी दिला.

Web Title: Undertaking traffic on the Konkan Railway from Mangaluru to Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.