मुंबई-गोवा महामार्गावर तेर्सेबांबर्डे अपघातात दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 03:32 PM2019-10-17T15:32:25+5:302019-10-17T15:34:03+5:30

मुंबई-गोवा महामार्गावर तेर्सेबांबर्डे येथे गुरुप्रसाद हॉटेलसमोर चारचाकी गाडी व मालवाहू ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात चारचाकी चालक जितेंद्र दळवी (४०) व क्लिनर किरण वोगटे (१९, रा. चिपळूण) हे दोघे जागीच ठार झाले. हा अपघात बुधवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास झाला.

Two killed in Tersebambarde accident on Mumbai-Goa highway | मुंबई-गोवा महामार्गावर तेर्सेबांबर्डे अपघातात दोघे ठार

तेर्सेबांबर्डे येथे चारचाकी व मालवाहू ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात चारचाकी गाडीचा चक्काचूर झाला.

Next
ठळक मुद्देमुंबई-गोवा महामार्गावर तेर्सेबांबर्डे अपघातात दोघे ठारचारचाकीने थांबलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक

कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर तेर्सेबांबर्डे येथे गुरुप्रसाद हॉटेलसमोर चारचाकी गाडी व मालवाहू ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात चारचाकी चालक जितेंद्र दळवी (४०) व क्लिनर किरण वोगटे (१९, रा. चिपळूण) हे दोघे जागीच ठार झाले. हा अपघात बुधवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास झाला.

कोल्हापूरहून गोव्याच्या दिशेने स्टीलची वाहतूक करणारा ट्रक शंकर बोकडेकर हे घेऊन जात होते. तेर्सेबांबर्डे येथील गुरुप्रसाद हॉटेलसमोरील महामार्गावर टायर पंक्चर झाल्याने हा ट्रक थांबला होता. दरम्यान, रत्नागिरीहून गोव्याकडे भरधाव वेगात जाणाऱ्या चारचाकीने या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली.

या धडकेत चारचाकीचा दर्शनी भाग ट्रकच्या मागील भागात घुसल्याने त्याचा चक्काचूर झाला. ट्रकमध्ये ठेवलेले स्टील चारचाकीच्या केबिनमध्ये घुसल्याने चालक व क्लिनर यांचा जागीच मृत्यू झाला.

कुडाळ पोलीस निरीक्षक शंकर कोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र्र हुलावळे व सिंधुदुर्ग जिल्हा महामार्ग वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक उमाकांत पालव, हेडकॉन्स्टेबल मिठबांवकर, प्रदीप पुजारे, पोलीस नाईक पाडावे व कॉन्स्टेबल चव्हाण नाईक यांनी घटनेचा पंचनामा केला.

चारचाकी गाडीत अडकलेल्या या दोघांचे मृतदेह क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. त्यांच्याकडील मोबाईलमधील नंबरवरून त्यांच्या नातेवाईकांशी पोलिसांनी संपर्क साधल्यानंतर त्यांची ओळख पटली. सायंकाळी उशिरा मृतांचे नातेवाईक कुडाळ येथे दाखल झाले होते.

 

Web Title: Two killed in Tersebambarde accident on Mumbai-Goa highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.