कोकण रेल्वे मार्गावर दोन फेस्टिव्हल स्पेशल गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 05:53 PM2020-10-23T17:53:10+5:302020-10-23T17:56:34+5:30

konkanrailway, kankavli, festivaltrain, sindhudurgnews कोकण रेल्वे मार्गावर दोन फेस्टिव्हल स्पेशल गाड्या धावणार आहेत. नागपूर-मडगाव तसेच पुणे-मडगाव या दोन गाड्यांचा यामध्ये समावेश आहे. २३ ऑक्टोबरपासून या गाड्या सुरू होणार आहेत. अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Two festival special trains on the Konkan railway line | कोकण रेल्वे मार्गावर दोन फेस्टिव्हल स्पेशल गाड्या

कोकण रेल्वे मार्गावर दोन फेस्टिव्हल स्पेशल गाड्या

Next
ठळक मुद्देकोकण रेल्वे मार्गावर दोन फेस्टिव्हल स्पेशल गाड्या२३ ऑक्टोबरपासून या गाड्या सुरू होणार

कणकवली : कोकण रेल्वे मार्गावर दोन फेस्टिव्हल स्पेशल गाड्या धावणार आहेत. नागपूर-मडगाव तसेच पुणे-मडगाव या दोन गाड्यांचा यामध्ये समावेश आहे. २३ ऑक्टोबरपासून या गाड्या सुरू होणार आहेत. अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्यांच्या सोयीसाठी या दोन विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. यातील नागपूर - मडगाव मार्गावरील विशेष गाडी (०१२३५/०१२३६) नागपूर स्थानकावरून २३ व ३० ऑक्टोबर, तसेच ६ नोव्हेंबर २०२० या तारखांना सायंकाळी ४ वाजता सुटणार असून दुसऱ्या दिवशी ती गोव्यात मडगावला सायंकाळी ४ वाजून ४० मिनिटांनी पोहोचणार आहे.

परतीच्या प्रवासात ही गाडी मडगावहून २४, ३१ ऑक्टोबर तसेच ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी सुटेल आणि नागपूरला ती दुसऱ्या दिवशी रात्री ८ वाजून ३०मिनिटांनी पोहोचेल. वातानुकूलित, स्लीपर, सेकंड सीटींग दर्जाच्या २२ डब्यांची ही गाडी पूर्णपणे आरक्षित असेल. ही गाडी वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, नाशिक, इतगपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्‍वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थीवी व करमाळी स्थानकांवर थांबे घेईल.

दुसरी फेस्टिव्हल स्पेशल गाडी (०१४०९/०१४१०)पुणे - मडगाव मार्गावर धावणार आहे. ही गाडी पुण्याहून २३,३० ऑक्टोबर तसेच ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी सुटणार असून लोणावळा, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्‍वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थीवी तसेच करमाळी या स्थानकांवर थांबणार आहे. गाडी वातानुकूलित, स्लीपर, सेकंड सीटींग दर्जाच्या २२ डब्यांची पूर्णपणे आरक्षित असेल. शासनाच्या नियमावलीचे पालन करून या गाड्या धावणार आहेत.

 

Web Title: Two festival special trains on the Konkan railway line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.