सिंधुदुर्गातील तीन लघु पाटबंधारे प्रकल्प तुडुंब; पाहा, प्रकल्पातील पाणीसाठा...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 11:56 AM2021-06-15T11:56:03+5:302021-06-15T11:56:23+5:30

Sindhudurg : तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या २४ तासात १०२.२० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये २२८.१८४० द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण ५१.०१ टक्के भरले आहे.

Three small irrigation projects in Sindhudurg overflow, see, water storage in the project ... | सिंधुदुर्गातील तीन लघु पाटबंधारे प्रकल्प तुडुंब; पाहा, प्रकल्पातील पाणीसाठा...

सिंधुदुर्गातील तीन लघु पाटबंधारे प्रकल्प तुडुंब; पाहा, प्रकल्पातील पाणीसाठा...

googlenewsNext

 सिंधुदुर्गनगरी :  कणकवली तालुक्यातील हरकूळ, मालवण तालुक्यातील धामापूर आणि सावंतवाडी तालुक्यातील माडखोल हे तीन लघु पाटबंधारे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. तर ९ लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये ५० टक्क्या पेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे.

तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या २४ तासात १०२.२० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये २२८.१८४० द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण ५१.०१ टक्के भरले आहे. जिल्ह्याताली मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. 

मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर – ४०.३२४०, अरुणा – १९.५३६८, कोर्ले- सातंडी – २०.८३८० लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे – शिवडाव – १.७३४०, नाधवडे – २.२४३२, ओटाव – १.२६९०, देंदोनवाडी – ०.६००९, तरंदळे – ०.९४१०, आडेली – ०.४२१०, आंबोली – १.१९६०, चोरगेवाडी – १.०४००, हातेरी – १.१७५०, माडखोल – १.६९००, निळेली – १.०३८०, ओरोस बुद्रुक – ०.९७४०, सनमटेंब – १.२२४०, तळेवाडी – डिगस – ०.२६८०, दाभाचीवाडी – ०.८१८०, पावशी – १.६३९०, शिरवल – ०.९९४०, पुळास – १.२५२०, वाफोली – ०.५८८०, कारिवडे – ०.५१६०, धामापूर – २.४४१०, हरकूळ – २.३८००, ओसरगाव – ०.१०२०, ओझरम – १.११५०, पोईप – ०.२५२०, शिरगाव – ०.३२६०, तिथवली – ०.७४७०, लोरे – ०.९१५० या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.

Web Title: Three small irrigation projects in Sindhudurg overflow, see, water storage in the project ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.