कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्यानी एक तास आधी स्थानकात यावे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 04:41 PM2020-09-26T16:41:41+5:302020-09-26T16:42:55+5:30

कोकण रेल्वेच्या मार्गावर पुन्हा तुतारी आणि राजधानी एक्स्प्रेस या दोन गाड्या धावणार आहेत. पण या गाड्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना रेल्वेच्या निर्धारित वेळे आधी किमान एक तास आधी स्थानकात उपस्थित रहावे लागणार आहे. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून कोकण रेल्वे प्रत्येक प्रवाश्याची ट्रेन मध्ये प्रवेश करण्यापूर्वी तपासणी करणार आहे.

Those traveling by Konkan Railway should arrive at the station an hour earlier! | कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्यानी एक तास आधी स्थानकात यावे !

कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्यानी एक तास आधी स्थानकात यावे !

googlenewsNext
ठळक मुद्दे रेल्वेने प्रवास करणाऱ्यानी एक तास आधी स्थानकात यावे ! कोकण रेल्वे प्रशासनाचे आवाहन

कणकवली : कोकण रेल्वेच्या मार्गावर पुन्हा तुतारी आणि राजधानी एक्स्प्रेस या दोन गाड्या धावणार आहेत. पण या गाड्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना रेल्वेच्या निर्धारित वेळे आधी किमान एक तास आधी स्थानकात उपस्थित रहावे लागणार आहे. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून कोकण रेल्वे प्रत्येक प्रवाश्याची ट्रेन मध्ये प्रवेश करण्यापूर्वी तपासणी करणार आहे.

कोकण रेल्वेच्या मार्गावर २६ सप्टेंबर पासून तुतारी तर २ ऑक्टोबर पासून राजधानी एक्स्प्रेस या दोन गाड्या धावणार आहेत.या ट्रेन मधून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची रेल्वेमध्ये चढण्यापूर्वी तपासणी केली जाणार आहे. प्रत्येक प्रवाशाचे तापमान तपासून मगच रेल्वेमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.

शासनाच्या निर्धारित तापमानापेक्षा अधिक तापमान आढळल्यास त्या व्यक्तीला रेल्वेने प्रवास करता येणार नाही.प्रवाशांची संख्या लक्षात घेता प्रवाशानी किमान एक तास आधी रेल्वे स्थानकात उपस्थित रहावे असे आवाहन कोकण रेल्वेने केले आहे.त्याचबरोबर स्थानक परिसरात वावरताना प्रवाशानी परस्परात सुरक्षित अंतर ठेवून वावरायचे आहे .आयत्या वेळी येणाऱ्या प्रवाशांसाठी हि सूचना महत्वाची आहे . तपासणी पूर्ण झाल्यावरच त्यांना रेल्वेमध्ये प्रवेश मिळणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारी म्हणून ही सगळी पाऊले कोकण रेल्वे कडून उचलली जात आहेत.यामुळे तुम्ही जर कोकण रेल्वेने प्रवास करत असाल तर तुम्हाला तुमच्या निर्धारित वेळेच्या आधी किमान एक तास रेल्वे स्थानकात उपस्थित रहावे लागणार आहे.

Web Title: Those traveling by Konkan Railway should arrive at the station an hour earlier!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.