तेरेखोल नदीला पूर ;बांदा बाजारपेठेत पुराचं पाणी घुसलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 11:26 AM2021-06-17T11:26:27+5:302021-06-17T11:29:05+5:30

Rian Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने बांद्यातील तेरेखोल नदीला पूूूर आला. पुराचे पाणी बाजारपेठेत घुसले आहे. बांदा शहरातील आळवाडी-निमजगा रस्ता पाण्याखाली गेला आहे. काही दुकानात पाणी गेल्याने दुकानातील सामान सुरक्षितस्थळी हलविले आहे.

Terekhol river flooded; flood water infiltrated in Banda market | तेरेखोल नदीला पूर ;बांदा बाजारपेठेत पुराचं पाणी घुसलं

तेरेखोल नदीला पूर ;बांदा बाजारपेठेत पुराचं पाणी घुसलं

googlenewsNext
ठळक मुद्देतेरेखोल नदीला पूर ;बांदा बाजारपेठेत पुराचं पाणी घुसलंकणकवली, देवगड, वैभववाडी, सावंतवाडी तालुक्यात मुसळधार पाऊस

बांदा :सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने बांद्यातील तेरेखोल नदीला पूूूर आला. पुराचे पाणी बाजारपेठेत घुसले आहे. बांदा शहरातील आळवाडी-निमजगा रस्ता पाण्याखाली गेला आहे. काही दुकानात पाणी गेल्याने दुकानातील सामान सुरक्षितस्थळी हलविले आहे.

वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे पूल पाण्याखाली गेल्याने वेंगुर्ले मार्गे बेळगाव मार्ग वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे.जिल्हा प्रशासनाने बांदा शहर हे पूर प्रवण असल्याने सावंतवाडी तालुक्यासाठी जोखमीच्यावेळी एनडीआरएफचे पथक तैनात केले आहे.

या पथकाने मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी शहरातील तेरेखोल नदी व पूर प्रवण क्षेत्राची पाहणी केली होती.आज पहाटेच पुराचे पाणी नागरी वस्तीत शिरले. दुपारपर्यंत याठिकाणी पूरस्थिती होती, मात्र प्रशासनाचे एनडीआरएफचे पथक याठिकाणी फिरकलेच नाही.

कणकवली, देवगड, वैभववाडी, सावंतवाडी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला असून जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्या इशारा पातळीच्या बाहेर वाहत असल्याने बांदा परिसरातील काही नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.

Web Title: Terekhol river flooded; flood water infiltrated in Banda market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.