कणकवलीतील महामार्गावरील पथदीप सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 07:43 PM2021-05-24T19:43:33+5:302021-05-24T19:45:09+5:30

highway Kankavli Sindhudurg : कणकवली शहरातील गांगो मंदिर ते गडनदी पुलापर्यंतचे अनेक पथदीप गेले काही महिने बंद आहेत. वारंवार हे पथदीप सुरू करण्याची मागणी करूनही महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनी त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे दोन दिवसांत पथदीप सुरू न केल्यास आमची स्टाईल दाखवावी लागेल, असा इशारा नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी ठेकेदार कंपनी व महामार्ग प्राधिकरणला दिला.

Start street lights on the highway at Kankavali | कणकवलीतील महामार्गावरील पथदीप सुरू करा

कणकवली नगराध्यक्षांनी पथदीपांबाबत महामार्ग ठेकेदार कंपनी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी यांच्याशी रविवारी चर्चा केली.

googlenewsNext
ठळक मुद्देकणकवलीतील महामार्गावरील पथदीप सुरू करा समीर नलावडे यांची महामार्ग प्राधिकरण, ठेकेदार कंपनीला सूचना

कणकवली : शहरातील गांगो मंदिर ते गडनदी पुलापर्यंतचे अनेक पथदीप गेले काही महिने बंद आहेत. वारंवार हे पथदीप सुरू करण्याची मागणी करूनही महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनी त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे दोन दिवसांत पथदीप सुरू न केल्यास आमची स्टाईल दाखवावी लागेल, असा इशारा नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी ठेकेदार कंपनी व महामार्ग प्राधिकरणला दिला.

त्यानंतर रविवारी ठेकेदार कंपनी व महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी नगरपंचायतीमध्ये दाखल होत दोन दिवसांत पथदिव्यांची कामे मार्गी लावतो, असे त्यांनी आश्वासन दिले. अनेकदा सूचना देऊनही जर कामे होत नसतील तर आम्हांला आक्रमक भूमिका घ्यावी लागेल. पावसाळा तोंडावर आलेला असतानाच शहरातील महामार्ग चौपदरीकरणांतर्गत पथदिवे बंद आहेत. यामुळे पावसाळ्यात शहरात महामार्गावर काळोखाचे वातावरण राहणार आहे. जर दोन दिवसांत चौपदरीकरणाअंतर्गतचे पथदीप सुरू न झाल्यास आमचा हिसका दाखवावा लागेल, असा इशारा नलावडे यांनी दिला.

त्यानंतर महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता मणियार, शाखा अभियंता गणेश महाजन, ठेकेदार कंपनीचे अधिकारी आदींनी तत्काळ नगरपंचायतीमध्ये धाव घेत नगराध्यक्षांची चर्चा केली. यावेळी नगरसेवक अभिजित मुसळे, गटनेते संजय कामतेकर आदी उपस्थित होते.

यापूर्वी अनेकदा सूचना देऊन झाल्या. तरी ही कामे मार्गी लागत नाहीत. त्यामुळे नागरिकांना रात्रीच्यावेळी अंधारातून प्रवास करावा लागतो. दोन दिवसांत हे काम सुरू न झाल्यास आमच्या स्टाईलने काम करून घेतले जाईल, असा इशारा नगराध्यक्षांनी दिला. त्यावर येत्या दोन दिवसांत शहरातील महामार्गालगतचे पथदीप सुरू करण्याबाबत ठेकेदार कंपनी व महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले.

 

Web Title: Start street lights on the highway at Kankavali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.