पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 03:31 PM2020-07-02T15:31:49+5:302020-07-02T15:33:27+5:30

केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ कुडाळ तहसील कार्यालय येथे शिवसेनेच्यावतीने आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. यावेळी या दरवाढीबाबत प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांना निवेदन देण्यात आले. केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

Shiv Sena's agitation against petrol and diesel price hike | पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेचे आंदोलन

पेट्रोल, डिझेल दरवाढीबाबत प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांना शिवसेनेतर्फे राजन नाईक यांनी निवेदन दिले. यावेळी आमदार वैभव नाईक यांच्यासह अतुल बंगे, जयभारत पालव, राजन जाधव, बाळा कोरगावकर, सचिन काळप, गणेश भोगटे, सुशील चिंदरकर, योगेश धुरी आदी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देपेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेचे आंदोलनप्रांताधिकाऱ्यांना निवेदन सादर : नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखेच

कुडाळ : केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ कुडाळ तहसील कार्यालय येथे शिवसेनेच्यावतीने आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. यावेळी या दरवाढीबाबत प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांना निवेदन देण्यात आले. केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

सोमवारी दुपारी कुडाळ तालुका शिवसेनेच्यावतीने हे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी शिवसेनेचे कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, उपसभापती जयभारत पालव, माजी सभापती राजन जाधव, माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे, पावशी सरपंच बाळा कोरगावकर, नगरसेवक सचिन काळप, गणेश भोगटे, युवासेना जिल्हा समन्वयक सुशील चिंदरकर, राजू जांभेकर, योगेश धुरी, पावशी उपसरपंच दीपक आंगणे, कृष्णा तेली, राजू गवंडे, सुयोग ढवण व शिवसेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

पेट्रोल, डिझेल दरवाढीचा निषेध करून प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांना शिवसेनेच्यावतीने निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन महिन्यांपासून देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. याचा परिणाम सर्व क्षेत्रांवर झाला आहे. नागरिकांच्या उत्पन्नाचे स्रोत बंद झाल्याने बेरोजगारीची वेळ त्यांच्यावर आली आहे. अशा परिस्थितीत केंद्र शासनाने केलेली इंधन दरवाढ चुकीची आहे, असे ते म्हणाले.

भाजप सरकारला आश्वासनांचा विसर

केंद्रातील भाजप सरकारने सत्तेत येण्याअगोदर पेट्रोल, डिझेल दरवाढीचा प्रमुख मुद्दा प्रचारात आघाडीवर ठेवला होता. मात्र, भाजपाची सलग दोन वेळा देशात सत्ता येऊनही नागरिकांना ह्यअच्छे दिनह्ण पहावयास मिळाले नाहीत. कोरोना संकट काळातही सलग १५ ते २० दिवस सातत्याने पेट्रोल, डिझेलची दरवाढ केल्याने भाजप सरकारला आपल्या आश्वासनांचा विसर पडला आहे, असा टोला आमदार नाईक यांनी केंद्र सरकारला लगावला.

सातत्याने होतेय दरवाढ

लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्याने वाहनांचा वापर होऊन पेट्रोल, डिझेलची विक्री पुन्हा सुरू झाली आहे. मात्र, गेले १५ ते २० दिवस सातत्याने पेट्रोल व डिझेलची दरवाढ होत आहे. कोरोनाचे संकट देशावर अद्याप कायम असताना आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीस आलेल्या नागरिकांना ही इंधन दरवाढ म्हणजे त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखेच आहे, असेही ते म्हणाले.
 

Web Title: Shiv Sena's agitation against petrol and diesel price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.