सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 23:24 IST2025-12-02T23:22:52+5:302025-12-02T23:24:26+5:30
कार्यकर्त्याची मोठी गर्दी, पोलिस ठाण्यात दोन गट भिडल्यानंतर पोलिसांकडून बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
सावंतवाडी :सावंतवाडी शहरातील नगरपरिषद निवडणूक शांततेत पार पडत असतानाच मंगळवारी सायंकाळी येथील वनविभाग कार्यालयासमोर जोरदार बाचाबाची झाली हा मिटता ना मिटता तोच सावंतवाडी पोलीस ठाण्यात शिंदे सेना व भाजप चे पदाधिकारी कार्यकर्ते येथील पोलीस ठाण्यात चांगलेच भिडले त्यानंतर पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप करत दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना बाजूला केले.यावेळी पोलिस ठाण्यात दोन गट भिडल्यानंतर पोलिसांकडून बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
सावंतवाडी शहरातील नगरपरिषदेसाठी मतदान प्रकिया पार पडल्यानंतर येथील वनविभाग कार्यालया समोर शिंदे सेनेच्या कार्यकर्त्याच्या गाडीला भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या गाडीने हुलकावणी दिल्याने तेथे शाब्दिक बाचाबाचीचा प्रकार घडला. त्या पदाधिकाऱ्यांची गाडी अडवून शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी गाडीमध्ये बसलेल्या व्यक्तीना जाब विचारत या सर्वांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यामुळे वनविभागाच्या कार्यालयाजवळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.पण शिंदे सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते.त्यानंतर पोलिसांनी शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांवर जी गाडी घातली ती ताब्यात घेण्याची मागणी केली त्यानंतर पोलिसांकडून गाडी ताब्यात घेतली.
सावंतवाडी पोलिस ठाण्यात कार्यकर्ते भिडले
वन विभागासमोरील घटना पोलिसांनी हस्तक्षेप करत मिटवल्यानंतर शिंदे सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते येथील पोलीस ठाण्यात पोलिसांची भेट घेण्यासाठी आले होते त्यांच्या मागोमाग भाजपचे पदाधिकारी ही पोलिसांना दाखल झाले यावेळी जमा मोठा असल्याने पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना बाहेर जाण्याची विनंती केली त्यावेळी हे सर्व कार्यकर्ते बाहेर जात असतानाच यातील शिंदे सेनेचा कार्यकर्ता हा पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या केबिन मधून बाहेर आल्यानंतर बाहेरच उभे असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यात बाचाबाची झाली ही बाचाबाची एवढी वाढली दोन्ही गट आपापसात भिडले यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना बाजूला केले.
दोन गट भिडल्यानतर पोलिस आक्रमक
पोलीस ठाण्यातच भाजप व शिंदे सेनेचे कार्यकर्ते भिडल्यानंतर पोलीस ही चांगलेच आक्रमक झाले पोलिसांनी सर्वच कार्यकर्त्यां ना बाहेर काढत मोठा पोलिस बंदोबस्त वाढवला.
पोलिस ठाण्यात कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची गर्दी
सावंतवाडीतील घटनेनंतर येथील पोलीस ठाण्यात शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख संजीव परब नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नीता सावंत कविता भारती मोरे आबा केसरकर विश्वास घाग क्लेटस फर्नांडिस झेवियर फर्नांडिस सुधा कवठणकर यांच्यासह भाजप चे युवा नेते विशाल परब मनोज नाईक विनोद राऊळ अॅड.अनिल निरवडेकर सुधीर आडिवरेकर केतन आजगावकर अमित परब गुरूनाथ पेडणेकर आदि तळ ठोकून होते.तर पोलिस उपअधीक्षक विनोद कांबळे पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण उपनिरीक्षक माधुरी मुळीक आदिसह पोलिसांकडून कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.