Local Body Election Voting: पैसे वाटपाच्या संशयावरून सावंतवाडीत शिंदेसेना-भाजप कार्यकर्ते भिडले, पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
By अनंत खं.जाधव | Updated: December 2, 2025 16:28 IST2025-12-02T16:26:17+5:302025-12-02T16:28:38+5:30
पोलिस बंदोबस्त वाढवला

Local Body Election Voting: पैसे वाटपाच्या संशयावरून सावंतवाडीत शिंदेसेना-भाजप कार्यकर्ते भिडले, पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
सावंतवाडी : मालवणमध्ये पैसे वाटपावरून भाजप व शिंदे सेनेत धुमश्चक्री सुरू असतानाच सावंतवाडीतमतदानाच्या दिवशी सकाळीच पैसे वाटपाच्या संशयावरून शिंदेसेना व भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले. यावेळी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. मात्र वेळीच पोलिसांकडून तसेच स्थानिक कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर प्रभाग सातमध्ये पोलिसांकडून बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
सावंतवाडी शहरातील प्रभाग सात येथे हाय व्होल्टेज लढत असून वातावरण तणावपूर्ण आहे. अशातच खासकीलवाडा भागात मतदारांना पैसे वाटप होत असल्याच्या संशयावरून शिंदे गट आणि भाजपचे समर्थक एकामेकांच्या अंगावर धावून गेले. दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाची आणि धक्काबुक्की झाली. शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी भाजप समर्थकांवर पैसे वाटप करत असल्याचा आरोप केला.
दरम्यान या घटनेनंतर प्रभाग सातमध्ये पोलिसांकडून वाढीव बंदोबस्त ठेवण्यात आला असून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी पोलिस घेत आहेत. पोलिसांनी तत्काळ धाव घेत दोन्ही कार्यकर्त्यांना बाजूला करत वातावरण शांत करुन मतदान सुरळीत ठेवले.