खवले मांजराच्या तस्करी प्रकरणी सात जण ताब्यात, सावंतवाडीत कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 12:12 PM2020-01-16T12:12:24+5:302020-01-16T12:14:21+5:30

तब्बल ४० लाख रुपयांच्या किमंतीच्या खवले मांजराची तस्करी केल्याप्रकरणी सात जणांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई मंगळवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व सावंतवाडी वनविभागाच्या पथकाने माडखोल येथे हॉटेल सावली धाबा परिसरात केली.

Seven arrested in connection with smuggling cat smugglers | खवले मांजराच्या तस्करी प्रकरणी सात जण ताब्यात, सावंतवाडीत कारवाई

खवले मांजराच्या तस्करी प्रकरणी सात जण ताब्यात, सावंतवाडीत कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्देखवले मांजराच्या तस्करी प्रकरणी सात जण ताब्यातचाळीस लाखांच्या मांजरासह सात लाखांची गाडी जप्त

सावंतवाडी : तब्बल ४० लाख रुपयांच्या किमंतीच्या खवले मांजराची तस्करी केल्याप्रकरणी सात जणांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई मंगळवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व सावंतवाडी वनविभागाच्या पथकाने माडखोल येथे हॉटेल सावली धाबा परिसरात केली.

संतोष गणू चव्हाण (रा. मालवण), उमेश बाळा मेस्त्री, (बांदा), सुमित चंद्रकांत कडवेकर, (कोल्हापूर), विकास प्रकाश चव्हाण, (वारगाव), उदय श्रीकांत शेटे, (लांजा), मधुसूदन वसंत राऊळ, (माडखोल), गजानन अर्जुन सावंत. अशी ताब्यात घेण्यात आलेल्या सात जणांची नावे आहेत. त्यांच्याकडून ७ लाख रुपयांची इनोव्हा कार जप्त करण्यात आली आहे.

 

Web Title: Seven arrested in connection with smuggling cat smugglers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.