आंतरजिल्हा शिक्षक बदलीस सेनेचा विरोध : संजय पडते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 04:30 PM2020-06-27T16:30:11+5:302020-06-27T16:31:21+5:30

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शिक्षकांची पदे रिक्त असताना जिल्हा परिषद प्रशासनाकडून ६८ शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्याबाहेर सोडण्याचा घाट घातला जात आहे. याला आमचा प्रखर विरोध आहे. जर शिक्षकांना जिल्ह्याबाहेर सोडले तर शिवसेनेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते व जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब यांनी पत्रकार परिषदेतून दिला.

Sena opposes inter-district teacher transfer: Sanjay falls | आंतरजिल्हा शिक्षक बदलीस सेनेचा विरोध : संजय पडते

आंतरजिल्हा शिक्षक बदलीस सेनेचा विरोध : संजय पडते

Next
ठळक मुद्देआंतरजिल्हा शिक्षक बदलीस सेनेचा विरोध : संजय पडते ...अन्यथा आंदोलनाचा इशारा

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शिक्षकांची पदे रिक्त असताना जिल्हा परिषद प्रशासनाकडून ६८ शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्याबाहेर सोडण्याचा घाट घातला जात आहे. याला आमचा प्रखर विरोध आहे. जर शिक्षकांना जिल्ह्याबाहेर सोडले तर शिवसेनेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते व जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब यांनी पत्रकार परिषदेतून दिला.

संजय पडते आणि नागेंद्र परब यांनी जिल्हा परिषदेच्या कारभारावर कडाडून टीका केली. जिल्ह्यात शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असताना आंतरजिल्हा बदली पात्र ६८ शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचा घाट घातला जात आहे, याला आमचा विरोध आहे. गतवर्षीही जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेचा विरोध असतानाही १७६ शिक्षकांना आर्थिक व्यवहार करून जिल्ह्याबाहेर सोडले होते.

शिक्षकांची रिक्तपदे जिल्ह्यात असताना आणि नव्याने शिक्षक भरतीला बंदी असताना जिल्हा परिषद प्रशासन जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याची घाई करीत आहे. जोपर्यंत नव्याने भरती होत नाही तोपर्यंत संबंधित शिक्षकांना कार्यमुक्त करू नये असे वारंवार सांगत असताना व तसे ठराव झालेले असताना जिल्हाबाहेर जाणाºया ६८ शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचा घाट घातला जात आहे .

त्यामध्ये अर्थपूर्ण व्यवहार होतो की काय असा संशय आहे. जिल्हा परिषद भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे, असा खळबळजनक आरोप संजय पडते व नागेंद्र परब यांनी केला. तर जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यास आमचा प्रखर विरोध आहे. तरीही जर शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले तर शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात शिक्षकांची रिक्त पदे भरली जात नाहीत. त्यामुळे जर आंतरजिल्हा बदली करून काही शिक्षक गेले तर शाळांमध्ये शिक्षकांचा मोठा तुटवडा भासणार आहे. त्यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष द्यायला हवे.

Web Title: Sena opposes inter-district teacher transfer: Sanjay falls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.