सावंतवाडी कारागृह अधीक्षक वादाच्या भोवऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 07:38 PM2020-01-17T19:38:08+5:302020-01-17T19:38:48+5:30

कारागृहाच्या चार भिंतींच्या आतमध्ये घडणाºया या घटनांमुळे पुन्हा एकदा सावंतवाडीचे कारागृह वादाच्या भोवºयात सापडले असून, याची दखल कारागृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी घेणे गरजेचे आहे.

Sawantwadi jail superintendent surrounds controversy | सावंतवाडी कारागृह अधीक्षक वादाच्या भोवऱ्यात

सावंतवाडी कारागृह अधीक्षक वादाच्या भोवऱ्यात

googlenewsNext



गावकर मृत्यू प्रकरणाचे गूढ कायम : वरिष्ठ स्तरावरून चौकशीची गरज, सखोल चौकशी झाल्यास अनेक प्रकरणे बाहेर येण्याची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
सावंतवाडी : गेल्या सहा महिन्यांत सावंतवाडी कारागृहात दोन कैद्यांचे झालेले मृत्यू तसेच कैद्यांची झालेली मारामारी, कैद्यांचे उपोषण आदी प्रकरणामुळे सावंतवाडी कारागृह तसेच कारागृह अधीक्षक वादाच्या भोवºयात सापडले आहेत. या सर्व प्रकरणामागचे गूढ सत्य केव्हा बाहेर येणार याचीच सर्वजण वाट बघत आहेत. एवढ्या मोठ्या घटना होऊनसुद्धा अद्यापही कारागृहाला वरिष्ठांनी भेट न दिल्याने खरेच या प्रकरणाचे गांभीर्य नाही का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. मनसेच्या तक्रारीनंतर सावंतवाडीच्या प्रांताधिकाऱ्यांनी कारागृह महासंचालकांना दिलेल्या पत्रामुळे कारागृहात घडत असलेल्या घटनांचे गांभीर्य अधोरेखित होत आहे.
काही वर्षांपूर्वी सावंतवाडी कारागृहातून कु्ख्यात आरोपी ज्ञानेश्वर लोकरे हा पळून गेला होता. लोकरे पळून गेल्यानंतर कारागृह वरिष्ठ अधिकाºयांनी कारागृहाला भेट देऊन लोकरेला पळून जाण्यासाठी कोणी व कशी मदत केली? यात कोण कोण सामील होते याचे सत्य शोधून काढत दोषींवर कडक कारवाई केली होती. त्यामुळे नंतरच्या काही वर्षांत कारागृह प्रशासनाचा स्वच्छ कारभार समोर येऊ लागला होता. तसेच चांगल्या कामांनी ओळखले जात होते. सामाजिक उपक्रम राबविले जात होते. तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांची लागवड असो अगर कैद्यांच्या अंगी असलेल्या विविध कला या नेहमी चर्चेत रहात असत. तत्कालीन कारागृह अधीक्षक कैद्यांच्या माध्यमातून चांगले उपक्रम नेहमीच समाजासमोर आणत होते.
मात्र, अलीकडे दोन वर्षांत अधिकारी बदलले आणि चांगले उपक्रम मागे पडले. पूर्वीसारखेच कारागृह वेगवेगळ्या प्रकारांनी चर्चेत येऊ लागले आहे. सहा महिन्यांपूर्र्वीे कारागृहातील एक कैद्याचा झालेला मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचे सांगून पोलिसांनी त्यावर पडदा टाकला. मात्र, १९ नोव्हेंबरच्या जवळपास दोन कैद्यांमध्ये मारामारी झाली आणि त्यांनी देवळातील घंटा एका कैद्याच्या डोक्यावर मारून त्याला जखमी केले होते. हा प्रकार ताजा असतानाच २१ डिसेंबरला देवगड येथील राजेश गावकर यांचा मृत्यू झाला. या मृत्युचे गूढ अद्याप उलगडले नाही.
कैद्याचा मृत्यू झाला की त्या कैद्याचे शवविच्छेदन हे कोल्हापूर येथे केले जाते. त्यामुळे सीपीआर येथून कैद्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे हा अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही. त्यामुळे तपास पुढे सरकत नसल्याचे उत्तर पोलीस देत आहेत. मात्र, पोलिसांनी जप्त केलेल्या सीसीटिव्हीमध्ये राजेश गावकर हा कारागृहात दाखल झाल्यानंतर तो आजारी असूनही त्याला रुग्णालयात दाखल केले नाही. ज्या दिवशी तो मृत पावला त्याची वेळ नेमकी किती हे कारागृह प्रशासनाकडे उत्तर नाही. मृत पावल्यानंतर बºयाच वेळाने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १७ डिसेंबरला कारागृहात दाखल करत असताना राजेश गावकर यांच्या अंगावर सात जखमा होत्या. याची तपासणीही सावंतवाडी कुटीर रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाºयांनी केली होती. मात्र, मृत्यूनंतर जेव्हा तपासणी झाली त्यात आरोपीच्या अंगावरील जखमा वाढल्या होत्या.
त्यामुळे या प्रकरणाची दखल केंद्र सरकारच्या मानव हक्क आयोगाने तसेच कारागृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी घेणे बंधनकारक होते. पण अद्याप तशी दखलही घेतली नाही. पोलिसांनी गावकर दाखल झाल्यापासून तो मृत होईपर्यंतचे सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, त्यातही अनेक धक्कादायक प्रकार पुढे येतील, असे सांगण्यात येत आहेत. या सर्व घटनांचा अभ्यास केला तर कारागृहामध्ये पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. कारागृहाच्या चार भिंतींच्या आतमध्ये घडणाºया या घटनांमुळे पुन्हा एकदा सावंतवाडीचे कारागृह वादाच्या भोवºयात सापडले असून, याची दखल कारागृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी घेणे गरजेचे आहे.
सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी मनसेच्या आलेल्या निवदेनाची दखल घेऊन थेट कारागृह महासंचालकांनाच पत्र दिल्याने या प्रकरणामागची गंभीरता लक्षात येत असून, याचा सखोल तपास होणे तेवढेच गरजेचे बनले आहे.

Web Title: Sawantwadi jail superintendent surrounds controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.