मुख्यमंत्र्यांनी केलेली टीका राणेंनी स्वतःवर ओढवून घेतली ! : वैभव नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 04:04 PM2020-10-28T16:04:17+5:302020-10-28T16:08:11+5:30

Dasram Uddhav Thackeray, Narayan Rane, Shiv Sena , Vaibhav Naik, sindhudurg ' दसरा मेळाव्याच्या भाषणात ठाकरेंनी राणे आणि त्याच्या मुलांचा उल्लेख टाळला होता . मात्र , शिवसेना पक्षप्रमुखांनी दिलेले विशेषण आपल्यालाच चपखल बसते हे राणेंच्या लक्षात आल्याने त्यांनी ठाकरेंनी उडवलेली टोपी स्वत : हून झेलली आणि आपल्या डोक्यावर घालून घेतली , अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.

Rane took the criticism made by the Chief Minister on himself! : Vaibhav Naik | मुख्यमंत्र्यांनी केलेली टीका राणेंनी स्वतःवर ओढवून घेतली ! : वैभव नाईक

मुख्यमंत्र्यांनी केलेली टीका राणेंनी स्वतःवर ओढवून घेतली ! : वैभव नाईक

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांनी केलेली टीका राणेंनी स्वतःवर ओढवून घेतली ! : वैभव नाईक राणेंनी केला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख

कणकवली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील संयमी व सुसंस्कृत नेते आहेत. गेल्या पंधरा वर्षात शिवसेना सोडल्यानंतर नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर असंख्य वेळा त्यांचे नाव घेऊन टीका केली . परंतु ठाकरेंनी चुकूनही राणेंच्या नावाचा उल्लेख केला नाही .

दसरा मेळाव्याच्या भाषणात ठाकरेंनी राणे आणि त्याच्या मुलांचा उल्लेख टाळला होता . मात्र , शिवसेना पक्षप्रमुखांनी दिलेले विशेषण आपल्यालाच चपखल बसते हे राणेंच्या लक्षात आल्याने त्यांनी ठाकरेंनी उडवलेली टोपी स्वत : हून झेलली आणि आपल्या डोक्यावर घालून घेतली , अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.

याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पत्रकार परिषदेत आपण कोणाविषयी बोलत आहोत , याचेही भान राणेंना राहिले नाही . माजी मुख्यमंत्री असलेल्या राणेंनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला.

महाराष्ट्राच्या राजकारणाला यशवंतराव चव्हाण यांच्यापासून शरद पवारांपर्यंत सुसंस्कृत विरोधी नेत्यांची परंपरा आहे . त्यामुळे महाराष्ट्रात राजकारण करत असताना सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेते सभ्यतेचे काही अलिखित संकेत पाळतात. राणेंनी मुख्यमंत्री पदी विराजमान असलेल्या ठाकरेंचा एकेरी उल्लेख करून सभ्यतेचे अलिखित संकेत पायदळी तुडवले आहेत.

आमदार नीतेश राणेंना मी सांगू इच्छीतो की , मातोश्रीच्या अंगणात तुळशी वृंदावनच आहे . ' आपण हसे लोकाला आणि शेंबुड आपल्या नाकाला ' अशीच काहीशी नीतेश यांची अवस्था झाली आहे . मुळात ' संस्कार ' हा शब्दच त्यांच्या तोंडी शोभत नाही, असेही नाईक यांनी या म्हटले आहे .

 

 

 

Web Title: Rane took the criticism made by the Chief Minister on himself! : Vaibhav Naik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.