ओटवणेतील युवकाचा मुंबईत अपघातात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 11:30 AM2019-08-20T11:30:41+5:302019-08-20T11:31:30+5:30

मुंबई-अंधेरी येथे दुचाकी व ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात ओटवणे येथील योगेश गावकर हा युवक ठार झाला. हा अपघात शनिवारी रात्रीच्या सुमारास घडला असून, अपघाताच्या वृत्ताने ओटवणे गावावर शोककळा पसरली आहे. योगेशचा मृतदेह ओटवणे येथे आणण्यात आला.

Ottawa youth dies in accident in Mumbai | ओटवणेतील युवकाचा मुंबईत अपघातात मृत्यू

ओटवणेतील युवकाचा मुंबईत अपघातात मृत्यू

Next
ठळक मुद्देओटवणेतील युवकाचा मुंबईत अपघातात मृत्यूअपघाताच्या वृत्ताने ओटवणे गावावर शोककळा

सावंतवाडी : मुंबई-अंधेरी येथे दुचाकी व ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात ओटवणे येथील योगेश गावकर हा युवक ठार झाला. हा अपघात शनिवारी रात्रीच्या सुमारास घडला असून, अपघाताच्या वृत्ताने ओटवणे गावावर शोककळा पसरली आहे. योगेशचा मृतदेह ओटवणे येथे आणण्यात आला.

योगेश हा कामानिमित्त मुंबई येथे होता. तो ठाणे येथील एका ग्लोबल कंपनीत काम करीत असे. शनिवारी रात्री दहा वाजता कामावरून मित्रांसमवेत दुचाकीवरून तो राहत असलेल्या खोलीवर परतत असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत योगेशला गंभीर दुखापत झाली होती. तो रस्त्याच्या बाजूला फेकला गेला होता. अपघातानंतर ट्रक चालकाने तेथून पलायन केले.

त्याच्या मित्रांनी त्याला तत्काळ रिक्षाने ठाण्यातील खासगी रुग्णालयात हलविले. पण गंभीर दुखापत झाली असल्याने त्याचे वाटेतच निधन झाले. या घटनेची माहिती ओटवणे गावी रात्री उशिरा देण्यात आली.

अपघातानंतर अंधेरी येथील पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रविवारी योगेशचा मृतदेह ओटवणे येथे आणण्यात आला. योगेशच्या निधनाने ओटवणे गावावर शोककळा पसरली असून, अनेकांनी हळहळ व्यक्त केली.

योगेश हा मनमिळाऊ स्वभावाचा होता. त्याचे शालेय शिक्षण ओटवणे येथे तर महाविद्यालयीन शिक्षण सावंतवाडी येथे झाले होते. ओटवणे पंचक्रोशीत त्याचा मित्रपरिवारही मोठा होता. अलीकडेच तो मुंबईत येथे कामाला गेला होता. त्याच्या पश्चात आई-वडील, लहान भाऊ असा परिवार आहे.
 

Web Title: Ottawa youth dies in accident in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.