Coronavirus Unlock : जिल्ह्यात धबधब्यांच्या ठिकाणी जाण्यास मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 04:32 PM2020-06-27T16:32:11+5:302020-06-27T16:34:15+5:30

जिल्ह्यात सध्या कोरोना विषाणू बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

No access to waterfalls in the district | Coronavirus Unlock : जिल्ह्यात धबधब्यांच्या ठिकाणी जाण्यास मनाई

Coronavirus Unlock : जिल्ह्यात धबधब्यांच्या ठिकाणी जाण्यास मनाई

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात धबधब्यांच्या ठिकाणी जाण्यास मनाई खबरदारीचा उपाय : के.मंजुलक्ष्मी

कणकवली : जिल्ह्यात सध्या कोरोना विषाणू बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोना विषाणूच्या प्रसारास प्रतिबंध घालण्याच्यादृष्टीने जिल्ह्यातील मांगेली, तिलारी धरण, कोनाळकट्टा, कुंभवडे येथील धबधबा, आंबोली धबधबा, कावळेसाद पॉईंट, हिरण्यकेशी, धामापूर तलाव, कासारटाका, सावडाव धबधबा, शिवडाव धबधबा या ठिकाणी वैयक्तिकरित्या किंवा सामुदायिक रित्या एकत्र येण्यास बंदी घालण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.

या आदेशांची अंमलबजावणी पोलीस प्रशासन, तालुका दंडाधिकारी, ग्रामपंचायत व इतर विभागांनी काटेकोरपणे करावयाची आहे. आदेशाचा भंग केल्यास साथरोग प्रतिबंध कायदा १८९७ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ आणि भारतीय दंड संहिता १८८ नुसार शिक्षेस पात्र गुन्हा ठरणार आहे आणि त्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आदेशात सांगितले आहे.

Web Title: No access to waterfalls in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.