मुख्य वनसंरक्षक कार्यालयाकडून परस्पर बदल्या, बढत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 03:55 PM2021-03-10T15:55:26+5:302021-03-10T15:57:12+5:30

Forest Department Sindhudurg- कणकवली वनक्षेत्रपाल यांंना परस्पर नेमणूक दिल्याचे प्रकरण ताजे असतनाच आता सिंधुदुर्ग वनविभागातील अनेक अधिकारी, कर्मचारी यांना कोल्हापूर येथील मुख्य वनसंरक्षक कार्यालयाकडून परस्पर नेमणुका दिल्याचे पुढे आहे. यात मागील वर्षभरात ज्याची मॅटकडे तसेच न्यायालयीन प्रकरणे सुरू आहेत, अशांनाही पदोन्नती देण्यात आली आहे.

Mutual transfers from the Chief Conservator's Office, promotions | मुख्य वनसंरक्षक कार्यालयाकडून परस्पर बदल्या, बढत्या

मुख्य वनसंरक्षक कार्यालयाकडून परस्पर बदल्या, बढत्या

Next
ठळक मुद्देसिंधुदुर्ग उपवनसंरक्षक मात्र अंधारात मर्जीतील अधिकाऱ्यांकडे महत्त्वाचे तीन तीन कार्यभार

सावंतवाडी : कणकवली वनक्षेत्रपाल यांंना परस्पर नेमणूक दिल्याचे प्रकरण ताजे असतनाच आता सिंधुदुर्गवनविभागातील अनेक अधिकारी, कर्मचारी यांना कोल्हापूर येथील मुख्य वनसंरक्षक कार्यालयाकडून परस्पर नेमणुका दिल्याचे पुढे आहे. यात मागील वर्षभरात ज्याची मॅटकडे तसेच न्यायालयीन प्रकरणे सुरू आहेत, अशांनाही पदोन्नती देण्यात आली आहे. तसेच मर्जीतील अधिकाऱ्यांकडे तीन तीन कार्यभार देण्यात आल्याची चर्चा वनविभागातच सुरू आहे. याबाबत सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक शहाजी नारनवर यांना विचारले असता आपणास काही माहीत नाही, असे सांगत या विषयावर बोलण्याचे टाळले.

कणकवली वनक्षेत्रपाल दीपक सोेनवणे यांंच्याकडचा प्रभारी कार्यभार काढून घेत तो रत्नागिरीतील अधिकाऱ्यांकडे दिल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता हे प्रकरण एकच नसून, अशी अनेक प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. गेल्या वर्षभरात अशी अनेक प्रकरणे आहेत, की जी सिंधुदुर्ग वनविभागाला विश्वासात न घेताच बदल्या आणि पदोन्नती देण्यात आल्या असून, या नेमणुका परस्पर कोल्हापूर येथून करण्यात आल्याने स्थानिक पातळीवर यांची जोरदार चर्चा सुरू आहे. याबाबत सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक यांना विचारले असता ते मात्र यावर बोलण्याचे टाळत असून, मी अशा कोणत्याही शिफारशी बदली आणि बढतीसाठी केल्या नाहीत एवढेच ते सांगत आहेत.

 सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांनीही जर कोण परस्पर सिंधुदुर्गबाबत कोण निर्णय घेत असेल तर योग्य नाही या कोल्हापूर येथील या अधिकाऱ्याला बदली आणि बढती यामध्येच एवढा रस का, असा सवालही बरेगार यांनी केला आहे. मी याप्रकरणी चौकशी व्हावी यासाठी प्रयत्न करणार असून, मुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे माहिती देणार असल्याचे सांंगितले आहे.

सर्व प्रकरणांची चौकशी होण्याची अपेक्षा

मर्जी पाळणाऱ्या अधिकाऱ्यांकडे तीन तीन विभागांचे कार्यभार देण्यात आले आहेत. तर सिंधुदुर्गमध्ये सक्षम अधिकारी असताना बाहेरचे अधिकारी आणण्यात आले आहेत. तर ज्याच्यावर मॅट तसेच अन्य प्रकरणात न्यायालयीन प्रकिया सुरू आहे. अशा अधिकारी व कर्मचारी यांनाही त्यांना हवे ते ठिकाण देण्यात आले आहे. मात्र, हे सर्व करत असताना कोल्हापूर येथील मुख्य वनसंरक्षक कार्यालयाने सर्व नियम धाब्यावर बसवून या नेमणुका दिल्याचे वनविभागातील अधिकारी, कर्मचारी सांगत असून, या सर्व प्रकरणाची आणि बदल्यांची चौकशी व्हावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Mutual transfers from the Chief Conservator's Office, promotions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.