holi- शिमगोत्सवासाठी मुंबईकर दाखल, कणकवलीतील आठवडा बाजारात मोठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 01:35 PM2021-03-25T13:35:26+5:302021-03-25T13:41:05+5:30

corona virus Kankvali Market Sindhudurg- कणकवली परिसरात शिमगोत्सवासाठी दाखल झालेल्या मुंबईकर मंडळींनी विविध साहित्य खरेदीसाठी आठवडा बाजारात आवर्जून उपस्थिती लावली. त्यामुळे गर्दीचे प्रमाण काहीसे वाढले होते. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा अनेक ठिकाणी उडाल्याचे दिसून येत होते.

Mumbaikar arrives for Shimgotsava: Big crowd at weekly market in Kankavali | holi- शिमगोत्सवासाठी मुंबईकर दाखल, कणकवलीतील आठवडा बाजारात मोठी गर्दी

कणकवली बाजारपेठेत मंगळवारी आठवडा बाजाराला ग्राहकांची गर्दी दिसून येत होती. (छाया : ओंकार ढवण )

googlenewsNext
ठळक मुद्देकणकवलीतील आठवडा बाजारात मोठी गर्दीबाजारपेठेत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

कणकवली : कणकवली येथे मंगळवारी आठवडा बाजार भरतो. या दिवशी बाहेरगावांहून आलेल्या विक्रेत्यांमुळे बाजारपेठ फुलून जाते; तर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांची आठवडा बाजारात गर्दी दिसून येत असते.
कणकवली परिसरात शिमगोत्सवासाठी दाखल झालेल्या मुंबईकर मंडळींनी विविध साहित्य खरेदीसाठी आठवडा बाजारात आवर्जून उपस्थिती लावली. त्यामुळे गर्दीचे प्रमाण काहीसे वाढले होते. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा अनेक ठिकाणी उडाल्याचे दिसून येत होते.

मंगळवारी कणकवलीच्या आठवडा बाजाराच्या दिवशी कडाक्याच्या उन्हातही ग्राहकांनी खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली होती; तर आठवडा बाजारात विविध प्रकारच्या गावठी भाजीपाल्याची खरेदी करण्यात येत होती.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जाहीर केलेल्या नियमांचे पालन काटेकोरपणे होताना दिसत नव्हते. त्यामुळे प्रशासनाने याबाबत आता कडक धोरण अवलंबण्याची गरज आहे. अन्यथा कोरोनाचा संसर्ग परत वाढण्याची शक्यता आहे.

महागाईचा फटका

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या महागाईचा फटका सर्व घटकांना बसत असून सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले आहेत.ओले काजू, कोकम रस, विविध प्रकारची सरबते, कैऱ्या, आदी साहित्याच्या खरेदीसाठी मंगळवारच्या आठवडा बाजारात नागरिकांनी गर्दी केल्याने बाजार फुलला होता.
 

Web Title: Mumbaikar arrives for Shimgotsava: Big crowd at weekly market in Kankavali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.