Tauktae Cyclone Sindhudurg : वादळाचा सर्वात जास्त फटका महावितरणला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 07:06 PM2021-05-17T19:06:38+5:302021-05-17T19:08:35+5:30

Tauktae Cyclone Sindhudurg :  तौत्के चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटका हा महावितरणला बसला असून त्यामुळे महावितरणच्या एकूण 460 विद्युत वाहिन्या तुटल्या आहेत. त्यामध्ये 330 लो टेन्शन आणि 130 हाय टेन्शन विद्युत वाहिन्यांचा समावेश आहे.

MSEDCL was hit hardest by the cyclone | Tauktae Cyclone Sindhudurg : वादळाचा सर्वात जास्त फटका महावितरणला

Tauktae Cyclone Sindhudurg : वादळाचा सर्वात जास्त फटका महावितरणला

Next
ठळक मुद्देतौत्के चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटका महावितरणलामहावितरणला पावणे दोन कोटी रुपयांचे नुकसान

सिंधुदुर्ग  :  तौत्के चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटका हा महावितरणला बसला असून त्यामुळे महावितरणच्या एकूण 460 विद्युत वाहिन्या तुटल्या आहेत. त्यामध्ये 330 लो टेन्शन आणि 130 हाय टेन्शन विद्युत वाहिन्यांचा समावेश आहे.

जिल्ह्यात 880 विद्युत पोलही तुटले आहेत. विद्युत वितरणच्या नुकसानीचा प्राथमिक आकडा हा सुमारे पावणे दोन कोटी रुपयांचा आहे. त्याशिवाय वादळामुळे जिल्ह्यातील 21 सब स्टेशन ही बंद पडली होती.

दुपारपर्यंत त्यापैकी 12 ते 13 सब स्टेशन सुरू करण्याचे काम पूर्ण झाले होते. तर उर्वरीत सबस्टेशन सुरू करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी बाहेरील जिल्ह्यातील मनुष्यबळही जिल्ह्यात दाखल होत आहे.

Web Title: MSEDCL was hit hardest by the cyclone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.