भाजी मार्केट आरक्षण विकास प्रश्न ; फसवणूक प्रकरणी नगराध्यक्षानी गुन्हा दाखल करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2021 03:26 PM2021-01-27T15:26:28+5:302021-01-27T15:30:57+5:30

Kankavli Market Sindhudurg- कणकवली शहरात भाजी मार्केटच्या उभारणीमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली भागधारक असलेल्या ग्लोबल असोसिएटने शहरवासीयांची फसवणूक केली आहे . त्यांच्याच पक्षाचे असलेले कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी त्याबाबतचा आरोप सभागृहात केला आहे . त्यामुळे या फसवणूक प्रकरणी त्यांनी संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा. तसेच तेलींनी आपल्या भाजपा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी नगरसेवक कन्हैया पारकर यांनी केली आहे .

The mayor should file a case of fraud | भाजी मार्केट आरक्षण विकास प्रश्न ; फसवणूक प्रकरणी नगराध्यक्षानी गुन्हा दाखल करावा

भाजी मार्केट आरक्षण विकास प्रश्न ; फसवणूक प्रकरणी नगराध्यक्षानी गुन्हा दाखल करावा

Next
ठळक मुद्देफसवणूक प्रकरणी नगराध्यक्षानी गुन्हा दाखल करावा कन्हैया पारकर यांची मागणी ; भाजी मार्केट आरक्षण विकास प्रश्न

कणकवली : कणकवली शहरात भाजी मार्केटच्या उभारणीमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली भागधारक असलेल्या ग्लोबल असोसिएटने शहरवासीयांची फसवणूक केली आहे . त्यांच्याच पक्षाचे असलेले कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी त्याबाबतचा आरोप सभागृहात केला आहे . त्यामुळे या फसवणूक प्रकरणी त्यांनी संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा. तसेच तेलींनी आपल्या भाजपा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी नगरसेवक कन्हैया पारकर यांनी केली आहे .

येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत नगरपंचायत विरोधी पक्षगटनेते सुशांत नाईक , नगरसेवक रूपेश नार्वेकर उपस्थित होते .

यावेळी कन्हैया पारकर म्हणाले , भाजी मार्केट साठी आरक्षित असलेल्या ३२ गुंठे जागे पैकी १२ गुंठे जागा आणि १७ हजार चौरस फुटाचे बांधकाम ग्लोबल असोसिएट नगरपंचायतीला करारानुसार देणार आहेत . मात्र भाजी मार्केटचे बांधकाम करताना तळमजल्यावर पार्किंग आणि उर्वरित तीन मजल्यावर गाळे आणि भाजी विक्रीचे कट्टे बांधण्यात आले आहेत . एका मजल्यावर फक्त ४२ विक्रेत्यांची सोय होणार आहे . शहरात ३०० हून अधिक भाजी , फळ , फुल विक्रेते आहेत . त्यामुळे भाजी मार्केट बांधूनही शहरातील भाजी विक्रेत्यांचे तेथे स्थलांतर होणार नाही .

नगरपंचायतीला १२ गुंठे जागा देण्याच्या मोबदल्यात विकासकाने संपूर्ण ३२ गुंठे जागेचा एफएसआय घेतला आहे . या विकासकाच्या इमारती दर्शनी भागात आणि रस्त्यालगत आहेत . तर भाजी मार्केट अडगळीच्या ठिकाणी बांधण्यात आले आहे . तेथे जाण्यासाठी प्रशस्त रस्ता देखील नाही . तसेच ग्राहक पहिल्या मजल्यापर्यंतच भाजी व इतर वस्तू खरेदीसाठी जाऊ शकतात . दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर भाजी मार्केट उभारल्याचे उदाहरण आपल्या देशात तरी नाही . त्यामुळे १७ हजार चौरस फुटाचे बांधकाम बांधून देत असल्याचा तेली यांचा दावा खोटा आहे .

नगरपंचायत सभेत खुद्द नगराध्यक्ष समीर नलावडे यांनीच विकासकांनी शहरवासीयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे . नगराध्यक्ष हे भाजपचे आहेत . तर त्याच पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली आहेत . त्यांच्यावरील आरोप गंभीर आहेत . त्यामुळे त्यांनी तत्काळ आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला हवा . तसेच नगराध्यक्षांनीही विकासकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी प्रशासनाला भाग पाडायला हवे . नगराध्यक्षांनी तसे न केल्यास आम्ही विरोधक प्रशासनाकडे फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबतची मागणी करणार असल्याचेही पारकर यावेळी म्हणाले .

नगराध्यक्षाना शिवसेनेचे दरवाजे खुले

कणकवली भाजी मार्केट प्रश्नी कणकवली नगराध्यक्षांनी सर्वसामान्यांच्या हिताची भूमिका घेतली आहे . त्यांनी त्या भूमिकेवर ठाम राहावे . भाजी मार्केटमध्ये शहरवासीयांची फसवणूक होत आहे . खुद्द नगराध्यक्षांनीच आम्हा सर्व नगरसेवकांच्यावतीने त्याबाबतची भूमिका सभागृहात मांडली आहे .

भाजप पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली आहेत . तर नगराध्यक्ष समीर नलावडे हे देखील त्याच पक्षात आहेत . त्यामुळे त्यांच्यावर पक्षीय दबाव तसेच दडपण येण्याची शक्यता आहे . त्यांना पक्षाचे दरवाजे देखील बंद होऊ शकतात . तशी परिस्थिती निर्माण झाली तर नगराध्यक्षांना शिवसेनेचे दरवाजे खुले आहेत . त्यांना आमच्याकडे येण्यासाठी कुणाच्याही परवानगीची गरज नाही . त्यामुळे भाजी मार्केट प्रश्नी त्यांनी आपली भूमिका कायम ठेवावी. असे यावेळी सुशांत नाईक म्हणाले.

Web Title: The mayor should file a case of fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.