जिल्ह्यातील जनतेला अत्यल्प दरात वाळू उपलब्ध करून द्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 01:39 PM2020-11-12T13:39:26+5:302020-11-12T13:44:48+5:30

mns, sand, sindhudurgnews सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाळूच्या भरमसाठ दर वाढीमुळे बांधकाम व्यवसाय ठप्प अवस्थेत आहेत.ज्याचा थेट परिणाम बांधकाम कामगारांच्या रोजी - रोटीवर होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.शासनाचा महसूल बुडवून चोरटी वाळू गोवा राज्यात विकली जात असल्याने सिंधुदुर्ग मनसे आक्रमक झाली आहे. त्यामुळे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी धरणे आंदोलन छेडण्यात आले.

Make sand available to the people of the district at very low rates! | जिल्ह्यातील जनतेला अत्यल्प दरात वाळू उपलब्ध करून द्या !

जिल्ह्यातील जनतेला अत्यल्प दरात वाळू उपलब्ध करून द्या !

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यातील जनतेला अत्यल्प दरात वाळू उपलब्ध करून द्या ! मनसेची मागणी ; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात वाळूच्या भरमसाठ दर वाढीमुळे बांधकाम व्यवसाय ठप्प अवस्थेत आहेत.ज्याचा थेट परिणाम बांधकाम कामगारांच्या रोजी - रोटीवर होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.शासनाचा महसूल बुडवून चोरटी वाळू गोवा राज्यात विकली जात असल्याने सिंधुदुर्गमनसे आक्रमक झाली आहे. त्यामुळे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी धरणे आंदोलन छेडण्यात आले.

एकीकडे वाळूमाफिया व भ्रष्ट अधिकारी , तलाठी व मंडळ तलाठी आधिकारी यांच्या संगनमताने जिल्ह्यातील वाळूचा दिवसा ढवळ्या गोवा राज्यात पुरवठा होतोय तर दुसरीकडे जिल्ह्यातील जनतेला चोरट्या वाळूचे दर परवडत नसल्याने घर बांधकाम थांबले आहे.

जिल्ह्यातील बांधकाम व्यवसाय रेंगाळला असून ज्याचा फटका बांधकाम कामगारांना मोठ्या प्रमाणात बसत आहे . देवली , आंबेरी , चिपी , कवठी , कालावल खाडी आदी क्षेत्रात होणाऱ्या अवैध वाळू उपशाची गंभीर दखल घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्ह्यातील अवैध वाळू उपशावर प्रतिबंध घालुन अधिकृत वाळूची लिलाव प्रक्रिया राबवून जिल्ह्यातील जनतेला अल्प दरात वाळू पुरवठा व्हावा या मागणींसाठी मंगळवारी
जिल्हाधिकारी कार्यलयासमोर लक्षवेधी धरणे आंदोलन माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

याबाबत निवासी जिल्ह्याधिकारी , खनिकर्म आधिकारी व मनसे शिष्टमंडळ यांच्यात चर्चा होऊन कठोर कारवाई करण्याची ग्वाही महसूल प्रशासनाने दिली.पूलाच्या परिसरात वाळू उत्खनन होत असल्याने पुलाला धोका निर्माण झालेला आहे. तर काही ठिकाणी खार बंधाऱ्यांची धुप होत आहे.प्रशासन रॅम्प तोडीची कारवाई करते . मात्र बेकायदेशीर होड्या आणि परराज्यातील बेकायदेशीर वास्तव्य करणारे स्थलांतरित कामगार यांच्यावर कारवाई करत नाही. यामुळे वाळूमाफियांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे.

खाडी परिसरातील पारंपरिक रहिवाशांना सी आर झेड चे निर्बाध लावले जातात . मात्र वाळूचे अवैध रॅम्प बांधकाम तलाठ्यांच्या डोळ्यांदेखत केले जाते.प्रशासन कारवाई करत नसल्यास मनसे कायदा हातात घेईल. तसेच वेळीच कठोर कारवाई न झाल्यास मनसे मोर्चा काढून या भ्रष्ट यंत्रणेला जाब विचारील . असा इशारा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिला. ' या भ्रष्ट अधिकाऱ्यांचे करायचे काय खाली डोके वर पाय , वाळू आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची , एकदाच घुसणार मनसेच दिसणार ' अशा घोषणांनी मनसेने परिसर दणादून सोडला.

यावेळी मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे , सचिन तावडे , दत्ताराम बिडवाडकर , कुणाल किनळेकर , राजेश टंगसाळी , बाबल गावडे , विनोद सांडव , आपा मांजरेकर , गुरू गवंडे , चंदन मेस्त्री , बाळा पावसकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच आंबेरी , देवली परिसरातील ग्रामस्थही यावेळी उपस्थित होते .

Web Title: Make sand available to the people of the district at very low rates!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.