Maharashtra Election 2019 : राणे जिथे जातील त्या पक्षाची वाट लावतील- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 06:38 PM2019-10-16T18:38:44+5:302019-10-16T20:25:54+5:30

राणे जिथे जातील त्या पक्षाची वाट लावतील.

Maharashtra Election 2019 : Uddhav Thackeray critisize on narayan rane | Maharashtra Election 2019 : राणे जिथे जातील त्या पक्षाची वाट लावतील- उद्धव ठाकरे

Maharashtra Election 2019 : राणे जिथे जातील त्या पक्षाची वाट लावतील- उद्धव ठाकरे

Next

कणकवलीः राणे जिथे जातील त्या पक्षाची वाट लावतील. करून करून भागले आणि देवपूजेला लागले, अशी त्यांची अवस्था झाली आहे. शिवसेनेत होते त्यांना काढलं, काँग्रेसमध्ये होते त्यांना काढलं, आता शेवटचा पर्याय आहे, हा लढा सुसंस्कृत विरुद्ध खुनशी प्रवृती असा आहे. आपलं सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहे, ते कणकवलीतल्या प्रचारसभेत बोलत होते.  

ही पाठीत वार करणारी औलाद आहे. ज्या पक्षाला सोडून गेले, त्या पक्षाला राणेंचे शाप आहेत. माझ्या मित्राकडे हे नको म्हणून भाजपाला सावध करतोय, भाजपात खूनशी वृत्ती नको. विनायक राऊत थांबले, वैभव नाईक उभा राहिला अन् त्यांना गाडले. आता स्वाभिमान शब्दही सर्वात खूश झाला असेल. वाकवली ती मान आणि म्हणे पक्ष स्वाभिमान. मी भाजपाला सावधानतेचा इशारा द्यायला आलो आहे. ही भुतं तुमच्या मानगुटीवर बसल्याशिवाय राहणार नाहीत. मी टीका करायला आलो नाही, मित्राच्या घरात चोर घुसत असताना शांत कसा बसू?, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राणेंवर टीका केली आहे. 

दादागिरी करण्याचा कोणी प्रयत्न केल्यास तोडून-मोडून टाकू, कोकणी जनता भोळी-भाबडी आहे, परंतु अद्यापपर्यंत मर्दुमकी शिल्लक आहे हे कोणी विसरू नये. येणाऱ्या काळात संपूर्ण कोकण किनारपट्टीवर भगवा फडकावू, आम्ही गेली अनेक वर्षे त्यांना पाळले, परंतु आता ते मित्राकडे सुद्धा नको, अशी आमची मागणी होती. तरीसुद्धा त्यांना पक्षात प्रवेश देणाऱ्या भाजपाला आम्ही शुभेच्छा देतो, असे सूचक विधान त्यांनी केले आहे. 

मुख्यमंत्र्यांनी जर त्यांच्या पक्षातला एखादा चांगला उमेदवार दिला असता त्याच्याही प्रचाराला आम्ही आलो असतो. जे समोर उभे आहेत त्यांना शिवसेनाप्रमुखांनी लाथ मारून हाकलून लावलं होतं. शिवसेनाप्रमुखांनी यांना हाकलले म्हणून शिवसेना मोठी झाली, त्यानंतर हे काँग्रेसमध्ये गेले मग स्वतःचा पक्ष काढला आता भाजपामध्ये गेले. मी भाजपाला शुभेच्छा देतो. सुसंस्कृत भोळाभाबडा कोकण आणि खुनशी वृत्ती असं चित्र आहे. 10 रुपयांमध्ये गरिबांना जेवण देणार आहे. आता गरिबांच्या जेवणामध्ये मिठाचा खडा टाकू नका.  
आपले केंद्रामध्ये सरकार आहे, राज्यामध्ये आपलंदेखील मजबूत सरकार येत आहे. जे तुमच्या आडवे येतील त्यांना हद्दपार केल्याशिवाय मी राहणार नाही. माझा छान हिरवागार कोकण राख करून नाणार उभा करणार असाल तर मला असा विकास नको, जे आहे ते टिकवायचं आणि दुसरं वाढवायचं याला म्हणतात विकास. हे आहे त्याला भुईसपाट करणे म्हणजे विकास नाही, असं म्हणत त्यांनी भाजपावरही निशाणा साधला आहे. 

Web Title: Maharashtra Election 2019 : Uddhav Thackeray critisize on narayan rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.