कोकण रेल्वे सेवा विस्कळीत, कणकवलीत कोचीवल्ली गंगानगर एक्स्प्रेस थांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 05:41 PM2019-08-05T17:41:40+5:302019-08-05T17:42:56+5:30

मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. पेण येथील दुष्मी रेल्वे गेट परिसरात भू:स्खलन झाल्याने रेल्वे मार्गावर मातीचा ढिगारा आला होता. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. तर कणकवली रेल्वे स्थानकात कोचीवल्ली गंगानगर एक्स्प्रेस थांबवून ठेवण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.

Konkan Rail Service disrupted, | कोकण रेल्वे सेवा विस्कळीत, कणकवलीत कोचीवल्ली गंगानगर एक्स्प्रेस थांबविली

कणकवली रेल्वेस्थानकात कोचीवल्ली गंगानगर एक्स्प्रेस थांबवून ठेवण्यात आली होती.

Next
ठळक मुद्देकोकण रेल्वे सेवा विस्कळीतकणकवलीत कोचीवल्ली गंगानगर एक्स्प्रेस थांबविली

कणकवली : मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. पेण येथील दुष्मी रेल्वे गेट परिसरात भू:स्खलन झाल्याने रेल्वे मार्गावर मातीचा ढिगारा आला होता. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. तर कणकवली रेल्वे स्थानकात कोचीवल्ली गंगानगर एक्स्प्रेस थांबवून ठेवण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.

कोकणात गेले काही दिवस जोरदार पाऊस पडत आहे. या जोरदार पावसाचा फटका कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना बसला. त्यामुळे रविवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुमारे १२ गाड्या रद्द करण्यात आल्या असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले होते. गोव्याहून मुंबईकडे जाणारी जनशताब्दी एक्स्प्रेस कुडाळ येथे थांबवून ठेवण्यात आली होती. त्यामुळे कंटाळलेल्या प्रवाशांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी वाद घातला. त्यामुळे काही वेळ तेथील वातावरण तंग बनले होते. त्यानंतर ती गाडी रद्द करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.

करमाळी सीएसटी एक्स्प्रेस ओरोस येथे थांबवून ठेवण्यात आली होती. तर कणकवली रेल्वे स्थानकात कोचीवल्ली गंगानगर एक्स्प्रेस थांबवून ठेवण्यात आली होती. मडगाव निजामुद्दीन एक्स्प्रेस वैभववाडी येथे तर तुतारी एक्स्प्रेस सावंतवाडीत थांबविण्यात आली होती.
दादर रत्नागिरी, पुणे एर्नाकुलम, दिवा सावंतवाडी या गाड्यांही रद्द करण्यात आल्या होत्या. तर हजरत निजामुद्दीन - एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेस व हजरत निजामुद्दीन - एर्नाकुलम दुरांतो एक्स्प्रेस या दोन गाड्या दुसºया मार्गावरून वळविण्यात आल्या होत्या.

रत्नागिरी-दादर रोहा पर्यंत तर सावंतवाडी-दिवा ही गाडी रत्नागिरीपर्यंत सोडण्यात आली होती. दरम्यान, कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशांचे हाल झाले. रेल्वे प्रशासनाकडून वेळोवेळी गाड्यांबाबत ह्यअपडेटह्ण देण्यात येत होते. मात्र, नियोजित प्रवास करता न आल्याने प्रवासी पुढे काय करायचे या विचाराने गोंधळलेले होते.
 

Web Title: Konkan Rail Service disrupted,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.