कोल्हापूरच्या पिस्तूलचे कनेक्शन थेट कलमठ मध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 12:03 PM2021-01-15T12:03:01+5:302021-01-15T12:09:01+5:30

Crimenews Kankavli Kolhapur- कोल्हापूर येथील एका युवकाकडून पोलिसांनी ताब्यात घेतलेले पिस्तूल कलमठ येथील युवकाने दिल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे .

Kolhapur's pistol connection directly in Kalamath | कोल्हापूरच्या पिस्तूलचे कनेक्शन थेट कलमठ मध्ये

कोल्हापूरच्या पिस्तूलचे कनेक्शन थेट कलमठ मध्ये

googlenewsNext
ठळक मुद्दे कणकवली तालुुुक्यातील कलमठ येथील तरुण जाळ्यातमहामार्ग चौपदरीकरण ठेकेदार कंपनीच्या कामगारांना त्या युवकाकडून पुरवठा होत होता गांजा

कणकवली : कोल्हापूर येथील एका युवकाकडून पोलिसांनी ताब्यात घेतलेले पिस्तूल कलमठ येथील युवकाने दिल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे .

कलमठमधील युवकाकडून यापूर्वी महामार्ग चौपदरीकरण ठेकेदार कंपनीच्या कामगारांना गांजा पुरवठा करण्यात येत असल्याची ही चर्चा सुरू आहे . त्यामुळे त्या युवकाकडे आलेले पिस्तुल हे ठेकेदार कंपनीच्या कामगारांमार्फत मध्यप्रदेश कनेक्शन मधून आले का ? असाही सवाल उपस्थित केला जात आहे .

कोल्हापूरपोलिसांनी कणकवलीत येत कलमठ मधील त्या वीस वर्षीय युवकाला ताब्यात घेतले आहे. सध्या तो युवक कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात आहे . त्या युवकाचे कलमठ कणकवली भागात या पूर्वीचे काही कारनामे ही उघड झाले असून त्याच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे .

कलमठमधील त्या युवकाने कोल्हापूरमधील युवकाला पिस्तूल दिल्याचे पोलिसांकडे कबूल केल्याने कलमठमधील त्या युवकाने हे पिस्तूल आणले कुठून ? या हत्यार कनेक्शनचा नेमका संबंध काय ? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे .

या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्यार बाळगल्याप्रकरणी कोल्हापूर राधानगरी येथील सरवडेमधील एका युवकाला कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतले . त्याच्यावर कारवाई सुरू  आहे . सध्या तो तेथील पोलीस कोठडीत आहे. पोलीस कोठडीत त्या आरोपीकडे तपास करत असताना त्याने बाळगलेले पिस्तूल कुठून आणले याच्या चौकशी दरम्यान या पिस्तुलचे कणकवली तालुक्यातील कलमठ कनेक्शन समोर आले . त्यानंतर कोल्हापूर पोलीस कणकवलीत दाखल झाले .

त्यांनी आपल्यासोबत संशयित आरोपीला घेत कलमठमधील त्या युवकाचा शोध सुरू केला . कलमठ मधील तो युवक काही काळ कोल्हापूरमध्ये कामाला असल्याने आरोपी व युवकाची ओळख झाली होती . कणकवलीत या युवकाचा शोध घेत असताना पहिल्यांदा त्याच्या घराजवळ जाऊन चौकशी केली असता तो आपल्या आईसोबत कणकवलीत गेल्याचे समोर आल्याने पोलिसांनी आपला मोर्चा कणकवली शहरात वळवला .

कणकवली शहरात तहसीलदार कार्यालयाच्या मागे तो तरुण निदर्शनास येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले . त्याला कणकवली पोलिस स्टेशनमध्ये आणत त्याची रवानगी कोल्हापूरला करण्यात आली . मात्र , अद्याप कलमठमधील त्या युवकावर गुन्हा दाखल झालेला नाही .

पण कणकवली शहरालगत असलेल्या भागात हत्यार कनेक्शन उघड झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे . आता या प्रकरणात अजून कोणती नावे पुढे येतात ? याकडे लक्ष लागून राहिले आहे . तसेच ठेकेदार कंपनीच्या कामगारांचे यामागे काही कनेक्शन आहे का ? त्याचाही पोलिस तपास होण्याची गरज आहे .

Web Title: Kolhapur's pistol connection directly in Kalamath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.