CoronaVirus Lockdown : युवक-युवतींच्या नोकरीचा प्रश्न सुटणार, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांशी केसरकरांची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 03:47 PM2020-05-26T15:47:22+5:302020-05-26T15:52:07+5:30

गोवा राज्यात राहण्याची सोय आहे त्यांना नोकरीत जलदगतीने सामावून घेतली जाईल, असे आश्वासन गोवा मुख्यमंत्री सावंत यांनी दिले आहे. जे पूर्वी नोकरीत होते. त्यांच्यासाठी दीपक केसरकर यांनी प्रमोद सावंत यांच्याशी फोनवरून चर्चा केल्यानंतर हा तोडगा निघाला.

Kesarkar's discussion with Goa Chief Minister will solve the problem of youth jobs | CoronaVirus Lockdown : युवक-युवतींच्या नोकरीचा प्रश्न सुटणार, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांशी केसरकरांची चर्चा

CoronaVirus Lockdown : युवक-युवतींच्या नोकरीचा प्रश्न सुटणार, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांशी केसरकरांची चर्चा

Next
ठळक मुद्देयुवक-युवतींच्या नोकरीचा प्रश्न सुटणार, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांशी केसरकरांची चर्चा जलदगतीने सामावून घेणार असल्याचे आश्वासन

सावंतवाडी : गोवा राज्यात राहण्याची सोय आहे त्यांना नोकरीत जलदगतीने सामावून घेतली जाईल, असे आश्वासन गोवा मुख्यमंत्री सावंत यांनी दिले आहे. जे पूर्वी नोकरीत होते. त्यांच्यासाठी दीपक केसरकर यांनी प्रमोद सावंत यांच्याशी फोनवरून चर्चा केल्यानंतर हा तोडगा निघाला.

गोवा राज्यात नोकरीस असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवक-युवतींना नोकरीत पुन्हा संधी मिळाली पाहिजे म्हणून माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यावेळी गोवा राज्यात निवासी सोय असणाऱ्यांना तातडीने संधी दिली जाईल तर निवासी सोय नसणाऱ्याबाबतीत १ जूनपर्यंत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले आहे, असे केसरकर यांनी सांगितले.

ई-पास तपासणी करून नोकरीत संधी दिली जाईल, असे ते म्हणाले. तसेच ज्यांची राहण्याची सोय नाही, येऊन जाऊन नोकरीधंदा सांभाळत होते त्यांच्याबाबत येत्या १ जूनपर्यंत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. गोवा राज्याचे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या समन्वयातून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी केसरकर यांनी रविवारी चर्चा केली.

गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, गोवा राज्यात राहण्याची सोय आहे, अशा तरुण-तरुणींना पासेस दिले जातील आणि नोकरीत सामावून घेतली जाईल, असे आश्वासन दिले. तसेच राहण्याची सोय नाही आणि ये-जा करून सहभाग घेणार आहेत. त्यांच्या बाबतीत १ जून रोजी निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपणास आश्वासन दिले आहे, अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी दिली

राज्यात राहण्याची सोय असणाऱ्या आणि पूर्वी नोकरी करणाऱ्या सर्व तरुण-तरुणींनी पासेस मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन दीपक केसरकर यांनी केले. मुंबईमधून काही रूग्ण औषधे आणत होते. त्यांना गोवा राज्यातून औषधे उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी ठेवला होता.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली, असे केसरकर म्हणाले. गोवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी उत्तर गोवा अधिकारी यांच्याशी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी चर्चा करून प्रस्ताव सादर करावा, असे ठरले.

आपण जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांना प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. गोवा राज्यात औषधे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी एका औषध दुकानावर देण्यात येणार आहे, असे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी आपणास सांगितले होते.
- दीपक केसरकर, आमदार

Web Title: Kesarkar's discussion with Goa Chief Minister will solve the problem of youth jobs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.