कणकवली नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे आंदोलन तूर्तास स्थगित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 08:12 PM2020-10-22T20:12:05+5:302020-10-22T20:14:42+5:30

Muncipal Corporation, sindhudurg, kankavli कणकवली नगरपंचायतचे कर्मचारी सतीश कांबळे यांना विरोधी पक्षातील नगरसेवक रुपेश नार्वेकर यांनी अपमानस्पद वागणूक दिली. असा आरोप करीत नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून कामबंद आंदोलन छेडले होते . याप्रकरणी आमदार नितेश राणे यांच्या सूचनेनुसार नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी कर्मचारी संघटनेशी चर्चा करत यशस्वी शिष्टाई केली. त्यानंतर नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन गुरुवारी तूर्तास स्थगित केले आहे.

Kankavali Nagar Panchayat employees' agitation postponed for now! | कणकवली नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे आंदोलन तूर्तास स्थगित !

कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी गुरुवारी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

Next
ठळक मुद्देबुधवार पासून केले होते कामबंद विरोधी नगरसेवकांनी अपमानास्पद वागणूक दिल्याची घटना

कणकवली : कणकवली नगरपंचायतचे कर्मचारी सतीश कांबळे यांना विरोधी पक्षातील नगरसेवक रुपेश नार्वेकर यांनी अपमानस्पद वागणूक दिली. असा आरोप करीत नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून कामबंद आंदोलन छेडले होते . याप्रकरणी आमदार नितेश राणे यांच्या सूचनेनुसार नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी कर्मचारी संघटनेशी चर्चा करत यशस्वी शिष्टाई केली. त्यानंतर नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन गुरुवारी तूर्तास स्थगित केले आहे.

दरम्यान, जनहितासाठी आम्ही हे आंदोलन मागे घेत आहोत, मात्र, पुन्हा असे कृत्य घडल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल. असे कर्मचारी संघटनेने स्पष्ट केले आहे. नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सकाळी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची भेट घेतली . यावेळी नलावडे यांनी घडलेला प्रकार आमदार नितेश राणे यांच्यापर्यंत पोचवण्यात आला असून , नागरिकांची कामे रखडू नयेत यादृष्टीने आपण काम बंद आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन कर्मचारी संघटनेला केले.

विरोधी नगरसेवकांकडून असे प्रकार सुरू असताना आपल्याला जनता केंद्रस्थानी ठेवून काम करायचे आहे . सत्ताधारी म्हणून या घटनेचा मी निषेध करतो . पण असे प्रकार पुन्हा घडले तर आम्ही कर्मचाऱ्यांसोबत राहणार असल्याचे आश्वासन समीर नलावडे यांनी यावेळी दिले .

एका विरोधी नगरसेवकाच्या चुकीमुळे कणकवली शहरातील जनतेला आपण वेठीस धरू नये . कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन छेडले तर कणकवली शहरातील जनतेची कामे पडून राहणार आहेत . त्यामुळे शहराचे व जनतेचे नुकसान होणार आहे . असे सांगत नितेश राणे यांनी हे आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी कर्मचारी संघटनेला दिली .

त्यानंतर कर्मचारी संघटनेच्यावतीने काम बंद आंदोलन मागे घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.
यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे , नगरसेवक अभिजीत मुसळे , नगरपंचायत कर्मचारी संघटनेचे किशोर धुमाळे , मयूर शिंदे , मनोज धुमाळे , प्रियांका सोंसुरकर , सतीश कांबळे , अमोल भोगले , विभव करंदीकर आदी उपस्थित होते .

Web Title: Kankavali Nagar Panchayat employees' agitation postponed for now!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.