कणकवली रुग्णालयाचे अधीक्षक डॉ .सहदेव पाटील यांचे निधन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 06:28 PM2021-01-13T18:28:52+5:302021-01-13T18:30:36+5:30

Kankavli Sindhudurg- मागील एक आठवड्यापासून ब्रेन हॅमरेजच्या कारणात्सव कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेले कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तथा प्रख्यात सर्जन डॉक्टर सहदेव पाटील (५९, लाकूडवाडी , ता . आजरा , सध्या रा . गडहिंग्लज ) यांचे सोमवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास निधन झाले .

Kankavali Hospital Superintendent Dr. Sahadev Patil passes away! | कणकवली रुग्णालयाचे अधीक्षक डॉ .सहदेव पाटील यांचे निधन !

कणकवली रुग्णालयाचे अधीक्षक डॉ .सहदेव पाटील यांचे निधन !

Next
ठळक मुद्देकणकवली रुग्णालयाचे अधीक्षक डॉ .सहदेव पाटील यांचे निधन !ब्रेन हॅमरेजमूळ प्रकृती गंभीर

कणकवली : मागील एक आठवड्यापासून ब्रेन हॅमरेजच्या कारणात्सव कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेले कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तथा प्रख्यात सर्जन डॉक्टर सहदेव पाटील (५९, लाकूडवाडी , ता . आजरा , सध्या रा . गडहिंग्लज ) यांचे सोमवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास निधन झाले .

गडहिंग्लज येथील शिवकृपा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे प्रमुख असलेले डॉ . सहदेव पाटील कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी , मुलगा , दोन मुली , पाच भाऊ व बहीण असा परिवार आहे.

डॉ. पाटील हे गडहिंग्लज येथील आपल्या गावी असताना गेल्या आठवड्यात अचानक आजारी पडले होते . त्यांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील झाली होती . मात्र, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती . निष्णात वैद्यकीय पथक सातत्याने त्यांच्या सेवेत दक्ष होते . मात्र , सोमवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली .

डॉ. पाटील हे सुमारे दीड वर्षापूर्वी कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे वैद्यकीय अधीक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांनी रुग्णांना चांगली सेवा दिली होती. कोरोनासारख्या काळातही कोरोना सेंटर, स्वॅब सेंटर व उपजिल्हा रुग्णालय अशा तिहेरी जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे हाताळल्या होत्या . मंगळवारी दुपारी त्यांच्यावर मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कणकवलीतील काही डॉक्टर व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Kankavali Hospital Superintendent Dr. Sahadev Patil passes away!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.