दूरसंचार अधिकाऱ्यांना जाब विचारला, राष्ट्रवादी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 04:12 PM2020-09-05T16:12:32+5:302020-09-05T16:14:30+5:30

गेले अनेक महिने कलंबिस्त येथील ग्रामस्थांना दूरसंचार विभागाची सेवा मिळत नव्हती. तर दूरध्वनी बंद असल्याने गैरसोय होत होती. कोरोनामुळे वर्क फॉर्म होम असल्याने अनेकांचे हाल होत होते. यासंबंधी येथील ग्रामस्थांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. त्यामुळेच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडीतील दूरसंचार विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांची भेट घेऊन जाब विचारला.

Jab asked the telecom officials, the NCP aggressive | दूरसंचार अधिकाऱ्यांना जाब विचारला, राष्ट्रवादी आक्रमक

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडीतील बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाºयांची भेट घेऊन जाब विचारला.

Next
ठळक मुद्दे दूरसंचार अधिकाऱ्यांना जाब विचारला, राष्ट्रवादी आक्रमक कलंबिस्त येथे अनेक दिवस दूरध्वनी सेवा बंद

सावंतवाडी : गेले अनेक महिने कलंबिस्त येथील ग्रामस्थांना दूरसंचार विभागाची सेवा मिळत नव्हती. तर दूरध्वनी बंद असल्याने गैरसोय होत होती. कोरोनामुळे वर्क फॉर्म होम असल्याने अनेकांचे हाल होत होते. यासंबंधी येथील ग्रामस्थांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. त्यामुळेच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडीतील दूरसंचार विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांची भेट घेऊन जाब विचारला.

यावेळी राष्ट्रवादी उद्योग व व्यापार सेलचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी, विजय कदम, उद्योग व व्यापारचे कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान, नवल साटेलकर, पद्मराज मुणगेकर, आर्यन रेडीज आदी उपस्थित होते. दरम्यान दूरसंचारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून संबधित अधिकाऱ्याला समज देण्यात आली. आजच्या आज ठप्प असलेली सेवा पूर्ववत केली जाईल, असे आश्वासन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

या घटनेबाबत तसेच कोविड काळात यंत्रणेवर आलेला ताण, तसेच ग्राहकांची होणारी गैरसोय दूर व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ही बाब शिवसेना खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या माध्यमातून निदर्शनास आणून देत जनतेला न्याय मिळवून देऊ, असे मत राष्ट्रवादी उद्योग व व्यापार सेलचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी व्यक्त केले.

 

Web Title: Jab asked the telecom officials, the NCP aggressive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.