आमदार नितेश राणेंसाठी 'हे' दुर्दैवी!, त्यांनी आधी..; सुशांत नाईकांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 01:41 PM2022-05-14T13:41:13+5:302022-05-14T13:42:28+5:30

नगरपंचायतीत बैठक घेऊन सूचना दिल्या परंतु दोन दिवस होऊनही प्रत्यक्षात कणकवलीत काय स्थिती आहे हे एकदा पहावे.

It is unfortunate that MLA Nitesh Rane has to hold a meeting in the Nagar Panchayat for vegetable sellers says Sushant Naik | आमदार नितेश राणेंसाठी 'हे' दुर्दैवी!, त्यांनी आधी..; सुशांत नाईकांचे टीकास्त्र

आमदार नितेश राणेंसाठी 'हे' दुर्दैवी!, त्यांनी आधी..; सुशांत नाईकांचे टीकास्त्र

googlenewsNext

कणकवली : आमदार नितेश राणे यांनी नगरपंचायतमध्ये भाजी विक्रेत्यांसंदर्भात बैठक घेऊन स्टंटबाजी करण्यापेक्षा त्यांच्याच पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली व नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यात असलेला भाजीमार्केटचा वाद मिटवावा. नगरपंचायतमधील सत्ताधारी अकार्यक्षम ठरल्याने आमदारांना भाजीविक्रेत्यांसाठी नगरपंचायतीत येऊन बैठक घ्यावी लागते ही दुर्दैवी बाब आहे. अशी टीका शिवसेनेचे नगरपंचायत गटनेते सुशांत नाईक यांनी केली आहे.

याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आमदार राणे यांनी कणकवली नगरपंचायतच्या अपूर्ण अवस्थेत असलेल्या भाजी मार्केटमध्ये भाजी विक्रेत्यांना नियमानुसार जागा उपलब्ध करून द्यावी. त्यांनी नगरपंचायतीत बैठक घेऊन सूचना दिल्या परंतु दोन दिवस होऊनही प्रत्यक्षात कणकवलीत काय स्थिती आहे हे एकदा पहावे. आमदार राणेंच्या सूचना नगरपंचायत सत्ताधाऱ्यांनी धाब्यावर बसविल्या आहेत.

याला नितेश राणेंनी दुजोरा दिला

आमदार राणेंना याप्रश्नी नगरपंचायतीत बैठक घ्यावी लागते, यावरूनच नगरपंचायतचे नगराध्यक्ष व सत्ताधारी हे कचरा निविदा, ठेकेदारी व बिल्डिंगमध्ये गुंतलेले आहेत. याला नितेश राणेंनी दुजोरा दिलेला आहे. असेही या प्रसिध्दीपत्रकात नाईक यांनी म्हटले आहे.

Web Title: It is unfortunate that MLA Nitesh Rane has to hold a meeting in the Nagar Panchayat for vegetable sellers says Sushant Naik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.