हत्तींचा प्रश्न कायमचा निकाली निघेल, उदय सामंत यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 10:50 AM2020-06-22T10:50:38+5:302020-06-22T10:51:54+5:30

दोडामार्ग तालुक्यातील केर, भेकुर्ली, मोर्ले आणि घोडगेवाडी गावांमध्ये हत्तींचा प्रश्न मोठा आहे. या प्रश्नावर प्रभावी उपाययोजना होणे गरजेचे आहे. त्यामुळेच हा प्रश्न कायमचा निकाली निघेल, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी दोडामार्ग तालुक्यातील केर येथे केले.

The issue of elephants will be settled forever, testified Uday Samant | हत्तींचा प्रश्न कायमचा निकाली निघेल, उदय सामंत यांची ग्वाही

दोडामार्ग तालुक्यातील हत्ती नुकसानीची पाहणी केल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी केर येथे ग्रामस्थांशी संवाद साधला.

Next
ठळक मुद्दे हत्तींचा प्रश्न कायमचा निकाली निघेल, उदय सामंत यांची ग्वाहीदोडामार्गमधील केर, मोर्ले गावातील नुकसानीची पाहणी

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील केर, भेकुर्ली, मोर्ले आणि घोडगेवाडी गावांमध्ये हत्तींचा प्रश्न मोठा आहे. या प्रश्नावर प्रभावी उपाययोजना होणे गरजेचे आहे. त्यामुळेच हा प्रश्न कायमचा निकाली निघेल, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी दोडामार्ग तालुक्यातील केर येथे केले. हत्तींमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री सामंत यांनी केर, मोर्ले या गावांना भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी पालकमंत्री सामंत यांच्यासमवेत खासदार विनायक राऊत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संजय पडते, संदेश पारकर, पे्रमानंद देसाई, केरच्या सरपंच मिनल देसाई, मोर्लेचे सरपंच महादेव गवस यांच्यासह कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. क्लेमेंट बेन, अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, उपवनसंरक्षक समाधान चव्हाण, सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, दोडामार्गचे तहसीलदार संजय कर्पे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री सामंत पुढे म्हणाले, हत्तींच्या प्रश्नावर वनविभागाने हत्ती कॅम्पसाठी प्रस्ताव तयार केला आहे. हत्तींसाठी कॅम्प उभारून त्यात त्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. या कॅम्पच्या उभारणीसाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा. त्यासाठी राज्य शासनाच्या स्तरावर लागणारे सर्व परवाने व मंजुरी तातडीने देण्यात येतील. केंद्र शासनाच्या स्तरावर खासदार विनायक राऊत स्वत: लक्ष घालतील व हा कॅम्प लवकरात लवकर सुरू होण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले.

विनायक राऊत म्हणाले, हत्ती कॅरिडॉर तयार करावा. त्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा. प्रस्ताव तयार करण्याच्या कामाचे वेळापत्रक बनवून त्याप्रमाणे नियोजनबद्ध प्रस्ताव करावा. त्यास केंद्रस्तरावरून मंजुरी देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न मी लक्ष घालून करीन. हत्तींमुळे बाधित झालेल्या सर्व गावांना हत्तीमुक्त करणे हेच ध्येय आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

दौरा ग्रामस्थांना फायदेशीर व्हावा

यापूर्वी हत्तींच्या प्रश्नावर सुरू करण्यात आलेल्या उपाययोजना जसे सोलर फेन्सिंग, ग्रामस्थांना सोलर बॅटरी पुरविणे ही कामे तातडीने पूर्ण करून घ्यावीत. सोलर फेन्सिंगचे २ किलोमीटरचे काम तातडीने पूर्ण करावे.
ग्रामपंचायतींनी दोन दोन लाखांची टेंडर काढून सोलर बॅटरी वाटपाचे काम पूर्ण करावे. गस्त घालण्यासाठी ग्रामस्थांना वनविभागाने सोबत घ्यावे. त्यांना तशा नेमणुका द्याव्यात.

नुकसान भरपाईसाठी नव्याने तयार केलेल्या प्रस्तावाचा पाठपुरावा करावा. हत्ती प्रश्नावर काही नवीन सूचना असल्यास त्याचे स्वागत आहे. पण अशा सूचना परिपूर्ण असाव्यात, अशा सूचना सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
आता हत्तींचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी लवकरच उपाययोजना कराव्यात. माझा आजचा दौरा हा ग्रामस्थांना फायदेशीर व्हायला हवा, असेही त्यांनी सांगितले.

 

Web Title: The issue of elephants will be settled forever, testified Uday Samant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.