कोविड बिलाच्या तक्रारीवर कार्यवाहीच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 08:35 PM2021-07-01T20:35:56+5:302021-07-01T20:37:29+5:30

CoronaVirus Sindhudurg : खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत लाभ देण्याबाबत त्यांच्याकडील आरोग्य मित्रांकडून संबधित लाभाबाबत कोविड रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अवगत करण्याच्या सूचना देवून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याबाबत कळविले आहे .

Instructions for proceeding on the complaint of Kovid Bill | कोविड बिलाच्या तक्रारीवर कार्यवाहीच्या सूचना

कोविड बिलाच्या तक्रारीवर कार्यवाहीच्या सूचना

Next
ठळक मुद्देकोविड बिलाच्या तक्रारीवर कार्यवाहीच्या सूचनामनसेच्या उपजिल्हाध्यक्षाना प्रांताधिकाऱ्यांनी दिले पत्र

कणकवली: खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत लाभ देण्याबाबत त्यांच्याकडील आरोग्य मित्रांकडून संबधित लाभाबाबत कोविड रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अवगत करण्याच्या सूचना देवून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याबाबत कळविले आहे .

देयकाबाबत कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यासाठी व संबंधितांना कळविण्याबाबत समितीस सूचना दिल्या असल्याचे पत्र प्रांताधिकाऱ्यांनी मनसेच्या उपजिल्हाध्यक्षाना दिले आहे . त्याचप्रमाणे निवासी नायब तहसीलदार तथा समन्वय अधिकारी तालुकास्तरीय समिती कणकवली , तालुका आरोग्य अधिकारी , सहाय्यक लेखाधिकारी ,पंचायत समिती यांनी आपल्या निवेदनातील कार्यवाहीच्या मुद्द्यांच्या अनुषंगाने तालुकास्तरीय समितीमार्फत पाहणी करणे व बिलांतील तफावतीच्या अनुषंगाने नियमानुसार कार्यवाही करून अहवाल सादर करण्याबाबत कळविले आहे .

१ जून ते २८ जूनपर्यंत एकूण १२५ रुग्णांना डिस्चार्ज दिलेले आहेत . त्यांना डिस्चार्ज देण्यापूर्वी प्रीऑडिट झाले आहे. त्यापैकी ६ रुग्णांच्या बिलात तफावत आढळलेली असल्याने संबधित रुग्णांना रक्कम परत करण्याच्या सूचनासंबंधित पेड कोविड हॉस्पिटल यांना कळविले आहे . मनसेच्या घंटानाद आंदोलनाच्या अनुषंगाने या कार्यालयात झालेल्या चर्चे दरम्यान प्राप्त झालेला वैभववाडी तालुक्यातील रुग्णाच्या नातेवाईकांचा अर्ज पुढील कार्यवाहीसाठी निवासी नायब तहसीलदार यांच्याकडे पाठविला आहे . वाढीव देयकाबाबत तक्रार प्राप्त झाल्यास उचित कार्यवाही करण्यासाठी तालुकास्तरीय समितीस सूचना दिलेल्या आहेत , असे या पत्रात नमूद केले आहे .
 

Web Title: Instructions for proceeding on the complaint of Kovid Bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.