माथाडी कामगारांच्या बेमुदत उपोषणास सुरुवात, आठ वर्षांचा महागाई भत्ता रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 07:31 PM2020-11-11T19:31:52+5:302020-11-11T19:33:36+5:30

labor, collcator, sindhudurgnews सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय धान्य गोदामात कार्यरत असलेल्या माथाडी कामगारांना देय असलेली एप्रिल २०११ ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीतील महागाई भत्तावाढीच्या फरकाची रक्कम अद्याप मिळालेली नाही. ती तत्काळ मिळावी या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शासकीय धान्य गोदाम माथाडी कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

Indefinite hunger strike of Mathadi workers begins | माथाडी कामगारांच्या बेमुदत उपोषणास सुरुवात, आठ वर्षांचा महागाई भत्ता रखडला

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माथाडी कामगार संघटनेच्यावतीने बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.

Next
ठळक मुद्देआठ वर्षांचा महागाई भत्ता रखडला रकमेचा आकडा परस्पर ठेकेदाराकडे, अपहाराची शक्यता

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय धान्य गोदामात कार्यरत असलेल्या माथाडी कामगारांना देय असलेली एप्रिल २०११ ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीतील महागाई भत्तावाढीच्या फरकाची रक्कम अद्याप मिळालेली नाही. ती तत्काळ मिळावी या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शासकीय धान्य गोदाम माथाडी कामगारांनीजिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

अखिल भारतीय माथाडी सुरक्षारक्षक, श्रमजीवी आणि जनरल कामगार युनियनच्यावतीने जिल्ह्यातील सुमारे ७० माथाडी कामगारांनी महागाई भत्ता वाढीतील फरकाची रक्कम अद्याप मिळाली नाही. तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने माथाडी कामगारांना देय असलेली महागाई भत्तावाढीतील फरकाची रक्कम माथाडी मंडळाकडे भरणा न करता ती संबंधित ठेकेदाराला अदा केली आहे. या लाखो रुपये रकमेचा ठेकेदार व शासकीय अधिकाऱ्यांनी संगनमताने अपहार केला आहे, असा आरोप करीत याची सखोल चौकशी करून माथाडी कामगारांच्या हक्काची रक्कम माथाडी कामगारांना मिळावी. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले.

या आंदोलनात माथाडी कामगार संघटनेचे महेश चव्हाण , दशरथ शिंदे (संयुक्त सरचिटणीस), सुनील मयेकर, सदानंद कदम, शंकर गुरव, नारायण शेल्टे, नंदू घाडीगावकर, प्रभाकर घाडीगावकर, सिद्धेश चव्हाण, दिनेश सावंत, राजू फाले आदी पदाधिकार्‍यांसह कामगार सहभागी झाले आहेत.
मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनीही मंगळवारी माथाडी कामगारांच्या प्रश्नांबाबत मंत्रालयात जाब विचारला जाईल असे आश्वासन देत उपोषणकर्त्यांची भेट घेतली.

कामगारांनी लक्ष वेधूनही कार्यवाही नाही

माथाडी कामगारांच्यावतीने दिलेल्या निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधताना या कामगारांनी कोरोना कालावधीत दिवस-रात्र मेहनत करून धान्य वितरणात शासनाला सहकार्य केले आहे. अत्यावश्यक सेवा बजावत असतानाही जिल्ह्यातील माथाडी कामगारांना देय असलेली एप्रिल २०११ ते नोव्हेंबर २०१८ या कलावधीतील महागाई भत्तावाढ फरकाची रक्कम माथाडी कामगारांना मिळालेली नाही. याबाबत माथाडी कामगार युनियनच्यावतीने वारंवार लक्ष वेधूनही अद्याप कार्यवाही झालेली नाही.

 

Web Title: Indefinite hunger strike of Mathadi workers begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.