Ganeshotsav 2019 Train Status: कोकण रेल्वे मार्गावरील एसी डबल डेकर, तुतारीचे डबे वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 05:23 AM2019-08-16T05:23:41+5:302019-08-16T05:24:15+5:30

Ganeshotsav 2019 Train Status: कोकणात जाणारी डबल डेकर आणि तुतारी एक्स्प्रेसच्या डब्याच्या संख्येत तात्पुरत्या कालावधीसाठी वाढ करण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

Increased the racks of  AC double decker & Tutari Express | Ganeshotsav 2019 Train Status: कोकण रेल्वे मार्गावरील एसी डबल डेकर, तुतारीचे डबे वाढले

Ganeshotsav 2019 Train Status: कोकण रेल्वे मार्गावरील एसी डबल डेकर, तुतारीचे डबे वाढले

Next

मुंबई : कोकणात जाणारी डबल डेकर आणि तुतारी एक्स्प्रेसच्या डब्याच्या संख्येत तात्पुरत्या कालावधीसाठी वाढ करण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत गर्दीचे विभाजन करण्यासाठी डब्यांची संख्या वाढविल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली.
कोकण रेल्वे प्रशासनाने लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव एसी डबल डेकर ११ वरून १८ डब्यांची केली आहे. या गाडीची संरचना द्वितीय श्रेणी एसीचा एक डबा, तृतीय श्रेणीचे ९ डबे, चेअर कारचे ६ डबे, जनरेटर कारचे २ डबे अशी असणार आहे. एसी डबल डेकरला २५ आॅगस्ट ते १९ सप्टेंबर या कालावधीसाठी जादा डबे जोडण्यात येतील.
दादर-सावंतवाडी-दादर तुतारी एक्स्प्रेस १५ वरून १९ डब्यांची करण्यात येईल. या गाडीची संरचना द्वितीय श्रेणी एसीचा एक डबा, तृतीय श्रेणीचा एक डबा, स्लीपर क्लासचे ७ आणि जनरल क्लासचे ८, सेकंड क्लासचे २ असे एकूण १९ डबे असतील. तुतारी एक्स्प्रेसला २२ आॅगस्ट ते १० सप्टेंबरपर्यंत जादा डबे जोडण्यात येणार आहेत.
एसी डबल डेकरला २५ आॅगस्ट
ते १९ सप्टेंबर आणि तुतारी एक्स्प्रेसला २२ आॅगस्ट ते १० सप्टेंबरपर्यंत जादा डबे जोडण्यात येणार आहेत. याचप्रमाणे दादर-सावंतवाडी-दादर तुतारी एक्स्प्रेसला द्वितीय श्रेणी एसीचा एक डबा तसेच तृतीय श्रेणीचा एक डबा आणि स्लीपर क्लासचे ७ आणि जनरल क्लासचे ८, सेकंड क्लासचे २ असे एकूण १९ डबे असतील.

Web Title: Increased the racks of  AC double decker & Tutari Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.