ऐतिहासिक मालवणनगरीला आदर्शवत पर्यटनस्थळ बनविणार! :उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2020 04:47 PM2020-12-01T16:47:14+5:302020-12-01T16:48:59+5:30

Malvan, Uday Samant , sindhudurg रॉक गार्डनमधील म्युझिकल फाऊंटन पर्यटकांसाठी अनोखी पर्वणी ठरेल. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात ऐतिहासिकपणा लाभलेले मालवण शहर कोकणातील आदर्शवत पर्यटनस्थळ बनवू, अशी ग्वाही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

Historic Malvannagar to be made an ideal tourist destination! : Rise of the feudal lords | ऐतिहासिक मालवणनगरीला आदर्शवत पर्यटनस्थळ बनविणार! :उदय सामंत

मालवण शहरातील रॉक गार्डन येथील म्युझिकल फाऊंटनचे लोकार्पण पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विनायक राऊत, वैभव नाईक, दीपक केसरकर, महेश कांदळगावकर आदी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देऐतिहासिक मालवणनगरीला आदर्शवत पर्यटनस्थळ बनविणार! :उदय सामंत मालवणात पाच कोटींच्या विकासकामांची सुपरफास्ट भूमिपूजने

मालवण : रॉक गार्डनमधील म्युझिकल फाऊंटन पर्यटकांसाठी अनोखी पर्वणी ठरेल. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात ऐतिहासिकपणा लाभलेले मालवण शहर कोकणातील आदर्शवत पर्यटनस्थळ बनवू, अशी ग्वाही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

शहरातील विविध प्रकल्प आणण्यासाठी, शहरात सोयी सुविधा अधिक निर्माण करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बांधकाम सभापती यतीन खोत व सहकारी सर्व नगरसेवक करीत असलेला पाठपुरावा कौतुकास्पद आहे. त्यामुळे शहर विकासासाठी कोट्यवधी रुपये निधी मंजूर होत आहे.


मालवण येथील रॉक गार्डन येथे पालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या कोकणातील एकमेव अशा म्युझिकल फाऊंटन प्रकल्पाचे लोकार्पण पालकमंत्री सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

त्याचबरोबर मालवण नगरपरिषद येथे अग्निशमन केंद्र व कर्मचारी निवासस्थान इमारत बांधकाम प्रकल्पासाठी २ कोटी एक लाख ४ हजार निधी मंजूर, १ कोटी ८१ लाख ३७ हजार निधीतून भाजी मार्केट इमारत बांधकाम करणे, १ कोटी २५ लाख निधीतून धुरीवाडा साईमंदिर जवळ क्रीडा संकुल ठिकाणी प्रमाणित बॅडमिंटन हॉल उभारणी या सुमारे पाच कोटी रुपयांच्या तीन प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर व बांधकाम सभापती यतीन खोत यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी शिवसेना नेते संदेश पारकर, संजय पडते, अतुल रावराणे, बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, नगरसेवक मंदार केणी, सुदेश आचरेकर, नितीन वाळके, दीपक पाटकर, पंकज सादये, गणेश कुशे, जगदीश गावकर, आप्पा लुडबे, आरोग्य सभापती पूजा सरकारे, तृप्ती मयेकर, पूजा करलकर, आकांक्षा शिरपुटे, दर्शना कासवकर, सुनीता जाधव, व्यापारी महासंघ जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटये, सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत, काँग्रेसचे बाळू अंधारी, पल्लवी तारी आदी उपस्थित होते.

 

Web Title: Historic Malvannagar to be made an ideal tourist destination! : Rise of the feudal lords

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.