Local Body Election Voting: सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवलीत सर्वाधिक मतदान, मालवणमध्ये किती.. जाणून घ्या
By सुधीर राणे | Updated: December 2, 2025 13:36 IST2025-12-02T13:34:31+5:302025-12-02T13:36:00+5:30
दुपारी ३:३० पर्यंत ५९.६१ टक्के मतदान झाले

Local Body Election Voting: सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवलीत सर्वाधिक मतदान, मालवणमध्ये किती.. जाणून घ्या
कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन नगरपरिषद आणि एक नगरपंचायतीसाठी आज, मंगळवारी मतदान प्रक्रिया सुरू आहे. सकाळी ११.३० वाजेपर्यंत सरासरी २९ टक्के मतदान झाले. दुपारपर्यंत मतदानात चांगलीच वाढ झाली. ३:३० पर्यंत ५९.६१ टक्के मतदान झाले.
सावंतवाडी नगरपरिषदेसाठी आतापर्यंत २५५३ पुरुष आणि २४८३ महिला मिळून एकूण ५०३६ एवढ्या मतदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला आहे. या ठिकाणी आतापर्यंत २५.९५ टक्के एवढे मतदान झाले आहे. मालवण नगर परिषदेसाठी आतापर्यंत एकूण २३७५ पुरुष आणि १९८६ महिला मिळून एकूण ४३६१ जणांनी मतदान केले आहे या ठिकाणी ३०.३२ टक्के एवढे मतदान झाले आहे.
वेंगुर्ला नगर परिषदेमध्ये आतापर्यंत १३५३ पुरुष आणि ११९४ महिला मिळून एकूण २५४८ जणांनी मतदान केले आहे या ठिकाणी २५.१९ टक्के एवढे मतदान झाले आहे. तर कणकवली नगरपालिकेसाठी आतापर्यंत २४०४पुरुष आणि २२०६ महिला मिळून एकूण ४६१० मतदारांनी मतदान केले आहे या ठिकाणी ३४.७२ टक्के एवढे मतदान झाले आहे.
गेल्या चार तासात जिल्ह्यातील चारही ठिकाणी मिळून एकूण ८६८६ पुरुष आणि ७८६९महिला मिळून एकूण १६,५५५ एवढ्या मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. जिल्ह्यात चारही ठिकाणी शांततेत मतदान सुरू असून जिल्हा प्रशासनासह पोलीस यंत्रनाही आपले काम चोख बजावत आहे.
दुपारी ३:३० पर्यंत ५९.६१ टक्के मतदान
- मालवण - ६१.४८%
- सावंतवाडी - ५३.८९%
- वेंगुर्ला - ५७.८०%
- कणकवली - ६७.३२%
- जिल्हा - ५९.६१%