ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्यावर विश्व हेलियम दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 04:45 PM2020-08-19T16:45:51+5:302020-08-19T16:47:53+5:30

ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्यावर हेलियम वायूचा शोध लागल्याने विजयदुर्ग हे हेलियम वायूचे पाळणाघर आहे. यामुळे आपल्याला जागतिक वारसा लाभला आहे. या ठिकाणी खगोल केंद्र झालेच पाहिजे, असे मत माजी आमदार प्रमोद जठार यांनी विश्व हेलियम दिनी मांडले.

Helium Day celebrations at Vijaydurg, | ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्यावर विश्व हेलियम दिन साजरा

विजयदुर्ग किल्ला येथील साहेबाचे ओटे याठिकाणी पुष्पहार अर्पण करून हेलियम डे साजरा करण्यात आला.

googlenewsNext
ठळक मुद्देविजयदुर्गमध्ये हेलियम डे साजराया ठिकाणी खगोल केंद्र झाले पाहिजे :प्रमोद जठार

देवगड : ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्यावर हेलियम वायूचा शोध लागल्याने विजयदुर्ग हे हेलियम वायूचे पाळणाघर आहे. यामुळे आपल्याला जागतिक वारसा लाभला आहे. या ठिकाणी खगोल केंद्र झालेच पाहिजे, असे मत माजी आमदार प्रमोद जठार यांनी विश्व हेलियम दिनी मांडले.

ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्यावर विश्व हेलियम दिन साजरा करण्यात आला. यावेळी माजी आमदार अजित गोगटे, सभापती सुनील पारकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाळा खडपे, कणकवली पंचायत समिती सभापती दिलीप जळेकर, उपसभापती डॉ. अमोल तेली, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, आरिफ बगदादी, पंचायत समिती सदस्य रवींद्र तिर्लोटकर, नगरसेवक सुभाष धुरी, रामकृष्ण जुवाटकर, उत्तम बिर्जे, विजयदुर्ग सरपंच प्रसाद देवधर, संजना आळवे, पूर्वा तावडे, वर्षा लेले, प्रदीप साखरकर आदी उपस्थित होते.

यावेळी माजी आमदार प्रमोद जठार पुढे म्हणाले, हा जागतिक वारसा आपण जतन केला पाहिजे. या ठिकाणी लवकरच खगोल केंद्र उभारण्याचा प्रयत्न करणार आहोत. जेणेकरून जगातील सर्व खगोल शास्त्रज्ञांना हे केंद्र जोडेल अशी शपथ त्यांनी घेतली.

विजयदुर्ग किल्ल्यावरील हेलियम वायूचा शोध लागलेल्या ह्यसाहेबाचे ओटेह्ण येथे पुष्पहार घालून जय जवान, जय किसान, जय विज्ञान, भारत माता की जय,हरहर महादेव अशा घोषणा देत हेलियम वायू शोधाच्या स्मृती जागविण्याचा प्रयत्न खगोलप्रेमी व विजयदुर्गवासीयांनी यावेळी केला.


 

Web Title: Helium Day celebrations at Vijaydurg,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.