सावंतवाडीत मुसळधार, वाहतूक विस्कळीत : अनेक पुलांवर पाणी, वाहने अडकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 10:32 AM2020-07-06T10:32:58+5:302020-07-06T10:34:10+5:30

सावंतवाडी तालुक्यात शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक नदी-नाल्यांना पूर आला आहे. कोलगाव काजरकोंड तसेच सावंतवाडी चराठेला जोडणाऱ्या नमसवाडी पुलावर पाणी आले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहने अडकून पडली होती. पावसामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद शनिवारी सायंकाळपर्यंत नव्हती.

Heavy rains disrupt traffic in Sawantwadi: Vehicles get stuck on several bridges | सावंतवाडीत मुसळधार, वाहतूक विस्कळीत : अनेक पुलांवर पाणी, वाहने अडकली

सावंतवाडी चराठे येथील नमसवाडी पुलावर पावसामुळे पाणी आले होते.

googlenewsNext
ठळक मुद्देसावंतवाडीत मुसळधार, वाहतूक विस्कळीत अनेक पुलांवर पाणी, वाहने अडकली

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यात शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक नदी-नाल्यांना पूर आला आहे. कोलगाव काजरकोंड तसेच सावंतवाडी चराठेला जोडणाऱ्या नमसवाडी पुलावर पाणी आले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहने अडकून पडली होती. पावसामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद शनिवारी सायंकाळपर्यंत नव्हती.

सावंतवाडी तालुक्यात शुक्रवारी रात्रीपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अनेक नद्यांना पूर आला आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोक घरात अडकून पडले आहेत. तसेच जिल्हाधिकारी यांनी आठ दिवसांसाठी संचारबंदी जाहीर केल्याने बाजारात रहदारी कमी आहे. एसटी सेवा पूर्णपणे बंद असल्याने ग्रामीण भागातून शहरात ग्रामस्थ येत नाहीत.

सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव काजरकोंड पूल पाण्याखाली गेले आहे. या पुलावरून सावंतवाडीतून कोलगावकडे तसेच कुणकेरी आंबेगावला लोक ये-जा करीत असतात. मात्र, पुलावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. तर दुसरीकडे चराठा येथील नमसवाडी पुलावर पाणी आले आहे. त्यामुळे अनेक वाहने अडकून पडली होती.

सावंतवाडी शहरात या भागातून मोठ्या प्रमाणात लोक येत असतात. पण सध्या लॉकडाऊन असल्याने लोक घरातच आहेत. मात्र, गेले दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे कुठेही जीवितहानी झाल्याची नोंद नाही. शनिवारी दिवसभरही पाउस कोसळत होता. आंबोली, माडखोल, सांगेली, दाणोली आदी भागात मुसळधार पाऊस कोसळला. ओटवणे सरमळेत मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर वाढत असून महसूल विभाग सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी सांगितले.

 

Web Title: Heavy rains disrupt traffic in Sawantwadi: Vehicles get stuck on several bridges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.